‘कॉर्पोरेट शाळा’ अध्यादेशाची होळी शिक्षण वाचवा संघर्ष समिती : शिवाजी चौकात निदर्शने; आंदोलन तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:00 AM2017-12-28T00:00:26+5:302017-12-28T00:01:45+5:30
कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राची दारे उघडी करून देणारे ‘महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन)’ या कायद्यात सुधारणा
कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राची दारे उघडी करून देणारे ‘महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन)’ या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. या अध्यादेशाची ‘शिक्षण वाचवा, संघर्ष समिती’च्या वतीने मंगळवारी सायंकाळी शिवाजी चौकात होळी करण्यात आली.
या विधेयकाविरोधात सर्व स्तरांतून राज्यभर तीव्र लढा उभा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला होता. पहिल्या टप्प्यांत परिपत्रकाची होळी केली. विधेयकाविरोधात सर्व स्तरांतून राज्यभर तीव्र लढाआंदोलनात दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, भरत रसाळे, प्रा. टी. एस. पाटील, डॉ. आर. जी. कोरबू, आनंदा हिरुगडे, शिवाजी भोसले, सुधाकर सावंत, गिरीष फोडे, अनिल चव्हाण, प्रा. सुनीता अमृतसागर, सदाशिव कांबळे, अनिल खोत, शिवाजी गुरव, उमेश देसाई, धर्माजी सायनेकर, एस. डी. लाड, नामदेव गावडे, धीरज पारधी, दशरथ कुंभार, पी. एन. बरगे, गौतम कांबळे, सुर्दशन सुतार, आदी उपस्थित होते.
उद्या बैठक...
सरकारच्या या निर्णयाविरोधात शिक्षकांबरोबरच सर्वांना एकत्र घेऊन आंदोलन उभे करण्याबाबत कोल्हापुरात परिषद घेण्यात येणार आहे. याच्या नियोजनाबाबत उद्या, शुक्रवारी विठ्ठल मंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.
कोल्हापुरातील शिवाजी चौक येथे बुधवारी ‘शिक्षण वाचवा, संघर्ष समिती’च्यावतीने ‘कॉर्पोरेट शाळा’ निर्णयाच्या अध्यादेशाची होळी केली.