यंत्रमाग कामगारांसाठी लवकरच महामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:35+5:302021-06-05T04:19:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांसाठी महामंडळाची स्थापना करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर ...

Corporation for loom workers soon | यंत्रमाग कामगारांसाठी लवकरच महामंडळ

यंत्रमाग कामगारांसाठी लवकरच महामंडळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांसाठी महामंडळाची स्थापना करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा सरकारच्या काळात तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी एकसदस्यीय समितीचा अहवाल दिला आहे. त्यामधील शिफारशींचा विचार करून लवकरच महामंडळ स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

बांधकाम कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी महामंडळाची स्थापना करावी. त्यातून त्यांना आवश्यक ते लाभ द्यावेत, अशी मागणी विविध कामगार संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली आहे. त्याची दखल घेत तत्कालीन सरकारने माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त केली होती. त्याचा अहवाल हाळवणकर यांनी शासनाकडे सादर केला आहे. त्यामधील यंत्रमाग कामगारांच्या शिफारशींमध्ये कामगारांसाठीचे फायदे व त्यासाठी आवश्यक सेस याचा ताळमेळ घालून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कामगार मंत्रिपदाची जबाबदारी मिळून आता एक महिना झाला आहे. त्यामुळे त्या अहवालातील संपूर्ण माहिती घेऊन कामगार मंडळ स्थापन करण्याचा लवकरच प्रयत्न करू. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व काॅंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनीही माझ्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. लवकरच त्याला मूर्तस्वरूप प्राप्त होईल.

Web Title: Corporation for loom workers soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.