नगरसेवकास मारहाण, नगराध्यक्षांना शिवीगाळ

By admin | Published: September 12, 2016 01:05 AM2016-09-12T01:05:36+5:302016-09-12T01:05:36+5:30

एकास अटक : निषेधार्थ आज गडहिंग्लज बंद, विविध संघटनांतर्फे मूक मोर्चाचे आयोजन

The corporator assaulted the municipal corporator | नगरसेवकास मारहाण, नगराध्यक्षांना शिवीगाळ

नगरसेवकास मारहाण, नगराध्यक्षांना शिवीगाळ

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील नागरिकांकडून दान मिळालेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नेताना नगरपालिकेचा ट्रॅक्टर व मुख्याधिकाऱ्यांची गाडी अडवून नगरसेवक नितीन देसाई यांना धक्काबुक्की व मारहाण आणि नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी धनंजय जयसिंग कळेकर (वय ३५, रा. भगतसिंग रोड, गडहिंग्लज) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज, सोमवारी शहरातील सर्व सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटनांतर्फे गडहिंग्लज बंद व मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गेल्या दहा वर्षांपासून येथील सामाजिक व शैक्षणिक संस्था-संघटनांतर्फे गणेशमूर्ती व निर्माल्यदानाचा उपक्रम राबविण्यात येतो. त्याकरिता नगरपालिकेतर्फे विसर्जन कुंड (काहिली) व निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीची व्यवस्था केली जाते.
रविवारी येथील हिरण्यकेशी नदीघाटावर नागरिकांकडून दान मिळालेल्या मूर्ती व निर्माल्य दरवर्षीप्रमाणे नगरपालिकेतर्फे संकलित करण्यात आले. त्यानंतर ते पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गांधीनगर पलीकडील रिंगरोडलगतच्या पडीक विहिरीकडे ट्रॅक्टरने नेण्यात येत होते. दरम्यान, रात्री पावणेदहाच्या सुमारास पंचायत समिती नजीकच्या पारस हॉटेलसमोरून नगरपालिकेचा ट्रॅक्टर आणि गाडी (क्रमांक एमएच ०९ एसी १००२) जात असताना कळेकरने त्या गाड्या अडविल्या. नगरसेवक देसाई यांना धक्काबुक्की करून मारहाण केली व नगराध्यक्ष बोरगावे यांना शिवीगाळ केली.
नगरपालिकेच्या ट्रॅक्टरचा चालक चंद्रकांत इंगळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी कळेकरला अटक केली. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्याची रविवारी जामिनावर सुटका झाली. पोलिस उपनिरीक्षक एस. ए. नागरगोजे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
ंंयांनी केले बंदचे आवाहन
गडहिंग्लज शहर किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, लायन्स क्लब, हॉटेल मालक संघटना, पानपट्टी चालक संघटना, मार्केट यार्ड व्यापारी संघ, इंडियन मेडिकल असोसिएशन, गडहिंग्लज अ‍ॅडव्होकेट बार असो., वॉच मेकर असो., सराफ असोसिएशन, हार्डवेअर व्यापारी असो., कापड व्यापारी संघटना, बेकरी व स्वीट मार्ट असो., कन्फेक्शनरी असो., टू व्हिलर मेकॅनिक असो., कोल्ड्रींक्स असो., नारळ व्यापारी संघटना., परमीट व बीअर बार संघटना, आॅईल मिल संघटना, केमिस्ट असो., सॉ मिल संघटना, आॅटोमोबाईल व स्पेअरपार्ट संघटना, बुकस्टॉल व स्टेशनरी विक्रेता संघटना, फुटवेअर असो., कंझ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर असो., नाभिक संघटना, चर्मकार संघटना, कॉन्ट्रक्टर असो., काटेवाला संघ, केटरिंग असो., युनिव्हर्सल फ्रेंडस् सर्कल आदी संघटनांच्या प्रतिनिधींची दुपारी तातडीची बैठक झाली. त्या बैठकीत लोकप्रतिनिधींवरील भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवून गडहिंग्लज बंद व मोर्चाचे आवाहन केले आहे.
 

Web Title: The corporator assaulted the municipal corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.