करिअरविषयक प्रश्नांना मिळणार अचूक उत्तर

By admin | Published: June 6, 2015 12:32 AM2015-06-06T00:32:14+5:302015-06-06T00:54:31+5:30

‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ : कोल्हापूर, सांगलीत आयोजन

Correct answer to career questions | करिअरविषयक प्रश्नांना मिळणार अचूक उत्तर

करिअरविषयक प्रश्नांना मिळणार अचूक उत्तर

Next

कोल्हापूर : करिअरविषयक अनेक प्रश्नांसाठी अचूक उत्तर असलेले ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन दि. १३ ते १५ जूनदरम्यान कोल्हापूरमध्ये आणि सांगली येथे १७ व १८ जूनला होणार आहे. प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती ‘एकाच छताखाली’ उपलब्ध होणार आहे.
‘लोकमत’ समूहाने ‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. कोल्हापूरमध्ये १३ ते १५ जून या कालावधीत राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात, तसेच सांगलीमध्ये १७ व १८ जूनला मिरज रोडवरील कच्छी समाजभवनात हे प्रदर्शन होईल. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरसाठीच्या, शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, प्रश्न असतात. त्या शंकांचे निराकरण आणि प्रश्नांना अचूक उत्तरे या प्रदर्शनात मिळतील. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. व्यवसायवाढीसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण, एकाच छताखाली हजारो विद्यार्र्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिकरीत्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे. त्यामुळे प्रदर्शनातील स्टॉल नोंदणीसाठी राहुल गजबर (९९२२९४४००१) आणि राजू घाटगे (९८५०३०४१७५) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

नामांकित शिक्षण संस्थांचा सहभाग...
मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरिन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या क्षेत्रांतील नामांकित शैक्षणिक संस्था, महाविद्यालये प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

Web Title: Correct answer to career questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.