लाचखोर भिकाजी कुर्हाडेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:43+5:302021-08-26T04:27:43+5:30

कोल्हापूर : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या शेतजमिनीच्या दाव्याचा निकाल आपल्या बाजूने देतो असे सांगून तीन लाखांची लाच घेताना ...

Corrupt Bhikaji Kurhade remanded in police custody for two days | लाचखोर भिकाजी कुर्हाडेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

लाचखोर भिकाजी कुर्हाडेला दोन दिवसांची पोलीस कोठडी

Next

कोल्हापूर : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या शेतजमिनीच्या दाव्याचा निकाल आपल्या बाजूने देतो असे सांगून तीन लाखांची लाच घेताना मंगळवारी इचलकरंजीत रंगेहात पकडलेल्या भिकाजी नामदेव कुर्हाडे (वय ५५, मूळ गाव नागराळ-कनार्टक, सद्या रा. साईनगर, चंदूर) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर इतर दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

कवठेगुलंद (शिरोळ) येथील एका जमिनीचा दावा अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे सुरू आहे. दाव्याचा निकाल अप्पर जिल्हाधिकारी यांना सांगून आपल्या बाजूने लावून घेतो असे म्हणून भिकाजी कुर्हाडे याने संंबंधिताकडे पाच लाखांची लाच मागितली, त्यापैकी दोन लाख मार्च २०२१ मध्ये घेतले. आणखी तीन लाखांची मागणी केल्यामुळे संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवले. चौकशीत लाचेसाठी कुर्हाडेचा मुलगा सारंग तसेच इम्रान मुसा शेख (रा. शंभर फुटी रोड, सांगली) यांनी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच घेताना भिकाजी कुर्हाडे याला इचलकरंजीत शिवाजी महाराज पुतळा परिसरात रंगेहात पकडले.

याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना बुधवारी न्यायालयात हजर केले, त्यावेळी त्यांपैकी भिकाजी कुर्हाडे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Corrupt Bhikaji Kurhade remanded in police custody for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.