लाचखोर आयकर निरीक्षक तपास ‘सीबीआय’ने करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:44+5:302020-12-22T04:24:44+5:30
डॉक्टरांकडून दहा लाखांची लाच स्वीकारताना आयकर विभागाचा निरीक्षक प्रताप चव्हाण याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांना अटक ...
डॉक्टरांकडून दहा लाखांची लाच स्वीकारताना आयकर विभागाचा निरीक्षक प्रताप चव्हाण याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांना अटक केल्यानंतर त्याच्या मालमत्तेच्या चौकशीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, ‘आयकर’ हा विभाग केंद्र सरकारचा असल्याने त्याबाबतचा पुढील तपास ‘सीबीआय’ने करावा, अशा मागणीचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सोमवारी दुपारी पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्याकडे पाठविला. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. सोमवरी दुपारी लाचप्रकरणातील संशयित चव्हाण याच्याबाबत त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर चौकशी करण्यात आली. पण वेळ अपुरा पडल्याने संबंधित अधिकाऱ्यांस आज, मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले आहे.या चौकशीत संशयित चव्हाण याच्या कारकीर्द, बढती, काही संशयास्पद हालचालींबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे समजते.
(तानाजी)