महागावमध्ये कोविड रुग्णांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:10+5:302021-05-08T04:24:10+5:30
कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या बाधित रुग्णांचे मानसिक खच्चीकरण झालेले असते. अलगीकरणातील उपचार आणि संवादविरहित जीवनामुळे रुग्ण नकारात्मक विचार करीत ...
कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या बाधित रुग्णांचे मानसिक खच्चीकरण झालेले असते. अलगीकरणातील उपचार आणि संवादविरहित जीवनामुळे रुग्ण नकारात्मक विचार करीत असतो. उपचारांनाही चांगला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. महागावमध्ये संत गजाननच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी रुग्णांना समुपदेशनाचा आधार दिला जात आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांशी सकारात्मक संवाद साधत त्यांना प्रेरणादायी कथा सांगणे, प्रार्थना घेणे, योगासन, प्राणायामच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
आयुर्वेदिक उपचार आणि समुपदेशनाच्या उपक्रमामुळे सातारा येथील एक गंभीर अवस्थेतील रुग्ण अल्पावधीतच बरा होऊन घरी परतला आहे. सेंटरमध्ये २४ तास रुग्णांवर उपचार आणि देखरेख असून, त्यासाठी सक्षम वैद्यकीय टीम कार्यरत आहे.