काऊंटडाऊन सुरुच , २७५८ रुग्ण कोरोना मुक्त होण्याच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 07:40 PM2020-10-16T19:40:07+5:302020-10-16T19:46:23+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा काऊंटडाऊन वेगाने सुरु असून शुक्रवारी ७२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले २७५८ रुग्ण कोरोनामुक्त होण्याची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत नवीन ८४ रुग्ण आढळून आले तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा काऊंटडाऊन वेगाने सुरु असून शुक्रवारी ७२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले २७५८ रुग्ण कोरोनामुक्त होण्याची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत नवीन ८४ रुग्ण आढळून आले तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला.
कोल्हापूर जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेबर अशा तीन महिन्यात अक्षरश: धुमाकुळ घातलेल्या कोरोनाचा आक्टोबर महिन्यात काऊंटडाऊन सुरु होईल यावर विश्वास बसत नव्हता. परंतू योग्य तसेच तातडीने उपचार, कोरोना चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, जनजागृती, घरोघरी सर्वेक्षण अशा विविध उपाययोजनामुळे ही साथ आटोक्यात आली. गेल्या काही दिवसापासून तर अनेक तालुक्यात केवळ एक दोन रुग्ण आढळून येत असून अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
शुक्रवारी पुन्हा एक दिलासा मिळाला. जिल्ह्यात केवळ ८४ रुग्ण आढळून आले, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यामध्ये शिरोळमधील अब्दुललाट, हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसी, गडहिंग्लजमधील लिंगनूर, करवीरमधील उजळाईवाडी, सोलापूरमधील सांगोला तर कोल्हापूर शहरातील रामानंदनगर येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४१ टक्के इतका झाले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने मोठा दिलासा देणारी ही बाब आहे. ज्या गतीने कोरोना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पसरला त्याच गतीने तो कमीही होत आहे. परंतू कोरोनाची भिती अजूनही जनतेच्या मनात असल्याने तोंडाला मास्क, सोशल डिस्टंन्सींगचे नियम पाळले जात आहेत.
-गेल्या चोवीस तासातील चाचण्या-
प्रकार निगेटिव्ह पॉझििटव्ह
- आरटीपीसीआर ४७४ २९
- ॲन्टीजेन १३३ १०
- खासगी लॅब १६६ ४५
तालुका निहाय रुग्ण संख्या -
आजरा - ८२६, भुदरगड - ११८३, चंदगड - ११३८, गगनबावडा - १३३, हातकणंगले - ५१२८, कागल - १६१०, करवीर - ५६६०, पन्हाळा - १८०८, राधानगरी - १२०१, शाहूवाडी - १२६०, शिरोळ - २४१३, नगरपालिकाहद्द - ७२५६, कोल्हापूर शहर - १४,२९६, इतर जिल्हा - २१४९.
- एकूण रुग्ण संख्या - ४७ हजार २११
- कोरोनामुक्त रुग्ण - ४२ हजार ८६५
- एकूण मयत रुग्ण - १५८८
- उपचार घेत असलेले रुग्ण - २७५८