Kolhapur: दुचाकी-टेम्पोच्या धडकेत दाम्पत्य ठार; दीपावलीचा बाजार करून परतताना घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 18:32 IST2024-10-30T18:31:22+5:302024-10-30T18:32:54+5:30
राशिवडे : राशिवडे येळवडे (ता. राधानगरी) दरम्यान दुचाकी व मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये संजय वसंत कांबळे (वय ...

Kolhapur: दुचाकी-टेम्पोच्या धडकेत दाम्पत्य ठार; दीपावलीचा बाजार करून परतताना घडली दुर्दैवी घटना
राशिवडे : राशिवडे येळवडे (ता. राधानगरी) दरम्यान दुचाकी व मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये संजय वसंत कांबळे (वय ४५) व त्यांची पत्नी सुरेखा संजय कांबळे (वय ४०) हे दोघे ठार झाले.
राशिवडे बाजारपेठेतून दीपावलीचा बाजार करून सायंकाळी सातच्या सुमारास हे दाम्पत्य पुंगाव (ता. राधानगरी) येथे आपल्या गावी दुचाकीवरून जात होते. येळवडेहून राशिवडेच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीवरील संजय कांबळे जागीच ठार झाले. अपघातात टेम्पो मोठ्या चरीत जाऊन उलटला.
सुरेखा कांबळे यांना गंभीर जखमी अवस्थेत सीपीआर येथे दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. संजय कांबळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहतूककोंडी झाली होती. राधानगरी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंब रस्त्यावर..
सेंट्रिंग काम करणाऱ्या संजय कांबळे यांना चार मुली आहेत. एक विवाहित, तीन शिक्षण घेणाऱ्या व अंध आई असा परिवार आहे. सुरेखा कांबळे याही रोजंदारी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. आज त्या परिते येथे दीपावलीसाठी लाडू बांधण्यासाठी हजेरीवर कामाला गेल्या होत्या. त्यांना आणण्यासाठी संजय गेले होते. घरी जात असताना दीपावलीचा बाजार घेऊन ते दोघे घरी निघाले होते, मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली.