टोपजवळील अपघातात उत्तरेश्वर पेठेतील दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 04:02 PM2017-08-31T16:02:31+5:302017-08-31T16:06:40+5:30
कोल्हापूर : मुलाच्या विवाह कार्यासाठी घुणकी (ता. हातकणंगले) येथे असलेल्या थोरल्या सुनेला आणण्यासाठी जात असताना पुणे-बेंगलोर महामार्गावरील टोपजवळ ताबा सुटून व्हॅन उलटल्याने कोल्हापूरातील उत्तरेश्वर पेठेतील दाम्पत्य ठार झाले तर अन्य तिघे जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी घडला. जखमींवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरु आहेत.

अन्वर रमजान शेख (वय ५५, रा. गोंधळी गल्ली, उत्तरेश्वर पेठ) आणि त्यांची पत्नी आसिफा ( ४८) अशी मृतांची नांवे आहेत. घटनेनंतर उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती.
याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, मृत अन्वर शेख यांचा धाकटा मुलगा आझिम यांचा विवाह आठ सप्टेंबर २०१७ रोजी आहे. अन्वर यांची थोरली सुन घुणकी येथे माहेरी बाळंतपणााठी गेल्या होत्या. गुरुवारी सकाळी अन्वर, त्यांची पत्नी आसिफा तसेच रिझवाना सलीम शेख (वय ४०), सुफिया युनूस सुरगून शेख (वय १३, दोघी रा. उत्तरेश्वर पेठ) आणि चालक नईम सुलतान शेख (३० रा. मस्कुती तलाव, उत्तरेश्वर पेठ) हे पाच जण व्हॅनमधून उत्तरेश्वर पेठ येथून निघाले.
पुणे-बेंगलोर महामार्गावरील टोप येथील शेतकरी संघाच्या पेट्रोलपंपाजवळ ब्रेक आॅईल जाम झाल्यामुळे अचानक व्हॅन उलटली. या अपघातात पाचही जण जखमी झाले. त्यांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, उपचार सुरु असताना अन्वर व त्यांची पत्नी आसिफा यांचा मृत्यू झाला.
मृत अन्वर शेख हे पिग्मी एजंट म्हणून काम करत होते. दरम्यान, हा प्रकार समजताच उत्तरेश्वर पेठेतील नागरिक सीपीआर आवारात जमले.सुफिया शेख,रिझवाना शेख व नईम शेख यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
धनंजय महाडिकसह क्षीरसागर, नियाज खान यांच्याकडून विचारपूस...
टोप येथे अपघात झाल्याचे समजताच खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, परिवहन सभापती नियाज खान, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी आदींनी सीपीआरला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
=============
फोटो : ३१०८२०१७-कोल-अन्वर अॅण्ड आसिफा शेख, टोप अॅक्सिडेंट