कोल्हापूरात बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करणा-या आरोपीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 07:37 PM2017-10-07T19:37:44+5:302017-10-07T19:38:11+5:30
कणेरी (ता. करवीर) येथील दोन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सत्र न्यायाधिश ए. यु. कदम यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा शनिवारी सुनावली.
कोल्हापूर - कणेरी (ता. करवीर) येथील दोन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सत्र न्यायाधिश ए. यु. कदम यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा शनिवारी सुनावली. प्रकाश संभाजी कुंभार (वय ३७, रा. पेड, ता. तासगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, फिर्यादी कणेरी येथे राहत असून त्यांचे सोबत त्यांचा मुलगा, सून, नात एकत्र राहतात. त्यांचा मोठा मुलगा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहणेस आहे. त्यांचा नातू कोल्हापूर येथे सहावीत शिक्षण घेत होता. त्यांच्या मुलीचा मुलगाही कोल्हापूरात शिक्षण घेत असल्याने दोघेजण परिक्षेनंतर आजोबांकडे राहण्यासाठी आले होते. मुलगीने वडीलांच्या घराशेजारीच नवीन घरे बांधले आहे. त्या मोरेवाडी येथे राहत असल्याने त्यांनी हे घर आरोपी प्रकाश कुंभार याला भाड्याने दिले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्री फिर्यादी हे दोघा नातवांना घेवून टेरेसवर झोपत होते. कुंभार हा देखील काहीवेळेसाठी टेरेसवर झोपून पुन्हा घरी जात होता.
दरम्यान ११ एप्रिल २०१४ रोजी रात्री जेवण करुन दहाच्या सुमारास दोघेही मुले आजोबासोबत टेरेसवर झोपण्यासाठी गेले. यावेळी आरोपी कुंभारही झोपण्यासाठी आला. रात्री अकराच्या सुमारास आजोबा लघुशंकेसाठी टेरेसवरुन खाली गेले. काही वेळाने ते परत वरती आले असता दोघेही नातू झोपलेल्या ठिकाणी नव्हते. कुंभार याचेकडे चौकशी केली असता दोघेही बाथरुमसाठी खाली गेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दूसºयादिवशी फिर्यादीच्या मुलीच्या मुलाने फोन लावून आम्हाला कोल्हापूरला घेवून जा, तुला काहीतरी सांगायचे आहे असे म्हणून आईला बोलवून घेतले.
त्यानंतर दोघांनीही कुंभार याने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानुसार २४ एप्रिल रोजी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात नराधम कुंभार याचे विरोधात गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक टी. बी. राठोड यांनी याप्रकरणी तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायाधीश कदम यांचेसमोर झाली. सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी गुन्हा शाबित करण्यासाठी दहा साक्षीदार तपासले. या सर्व साक्षी ग्राह्य धरुन आरोपीची विकृत मनोवृत्ती व वय विचारात घेवून हे कृत्य समाजाच्या दूष्ठीने घातक आहे. या सर्व युक्तीवादाचा विचार करुन त्याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.