आईच्या शरीराचे तुकडे करून खून करणाऱ्यास न्यायालयानं ठोठावली फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 11:28 AM2021-07-09T11:28:29+5:302021-07-09T11:29:31+5:30

कोल्हापुरातील ताराराणी चौकातील माकडवाला वसाहतीत राहणारा सुनील कुचकोरवी याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी, दारूला पैसे दिले नाहीत म्हणून स्वत:ची आई यल्लवा कुचकोरवी (६२) हिच्या शरीराचे चाकू, सुरी, सत्तूरने तुकडे करून तिचा निर्दयीपणे खून केला होता, तसेच तिच्या मृतदेहाची विटंबना केली होती.

Court sentences man to hanging for mutilating mother's body | आईच्या शरीराचे तुकडे करून खून करणाऱ्यास न्यायालयानं ठोठावली फाशीची शिक्षा

आईच्या शरीराचे तुकडे करून खून करणाऱ्यास न्यायालयानं ठोठावली फाशीची शिक्षा

Next

कोल्हापूर: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून आईचे तुकडे करून क्रूरपणे खून करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-४) महेश कृष्णाजी जाधव यांनी गुरुवारी मरेपर्यंत फाशीची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुनील रामा कुचकोरवी (३५, रा. माकडवाला वसाहत, ताराराणी चौक, कोल्हापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. क्रौर्याची परिसीमा गाठणारा हा प्रकार चार वर्षांपूर्वी घडला होता. 

कोल्हापुरातील ताराराणी चौकातील माकडवाला वसाहतीत राहणारा सुनील कुचकोरवी याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी, दारूला पैसे दिले नाहीत म्हणून स्वत:ची आई यल्लवा कुचकोरवी (६२) हिच्या शरीराचे चाकू, सुरी, सत्तूरने तुकडे करून तिचा निर्दयीपणे खून केला होता, तसेच तिच्या मृतदेहाची विटंबना केली होती. यानंतर तो पळून जाताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. प्रकरणाचा तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. एकूण ३४ पैकी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले.
 

Web Title: Court sentences man to hanging for mutilating mother's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.