न्यायालये आजपासून गजबजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:28 AM2021-09-07T04:28:57+5:302021-09-07T04:28:57+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे बंद असलेले कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे कामकाज आज, मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने पूर्ववत ...

The courts will be full from today | न्यायालये आजपासून गजबजणार

न्यायालये आजपासून गजबजणार

Next

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षे बंद असलेले कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे कामकाज आज, मंगळवारपासून पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू होत आहे, त्यामुळे न्यायालय परिसर वकील, पक्षकारांनी पुन्हा गजबजणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दोन डोस झालेल्या वकील व पक्षकारांनीच न्यायालयात यावे, मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करावा, स्वत:सह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र ॲन्ड बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. फक्त अत्यावश्यक खटलेच चालू होते. बहुतांशवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आरोपींना न्यायालयात हजर केले. आता जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे, बाधितांची संख्या घटल्याचे दिसत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज, मंगळवारपासून जिल्हा न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी जाहीर केले आहे.

न्यायालय आवारात रेंगाळू नये

कोरोना संसर्गाचा जिल्ह्यातील प्रभाव कमी झाला असला, तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शक्यतो लसीचे दोन डोस झालेल्या वकील व पक्षकारांनी न्यायालयात प्रवेश करावा, काम संपल्यानंतर न्यायालयाच्या आवारात जास्त वेळ बोलत थांबू नये.

प्रकृती अस्वस्थ वाटत असेल अथवा कोणतेही लक्षण जाणवत असेल, तर त्यांनी न्यायालयात येणे टाळावे, असे आवाहनही ॲड. विवेक घाटगे व जिल्हा बार असोसिशनशचे अध्यक्ष ॲड. रणजित गावडे यांनी केले आहे.

Web Title: The courts will be full from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.