कोविड केअर सेंटर दोन दिवसात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:44+5:302021-04-08T04:24:44+5:30
कोल्हापूर : शहरात सुरू करण्यात येत असलेले चार कोविड केंद्र येत्या दोन दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार ...
कोल्हापूर : शहरात सुरू करण्यात येत असलेले चार कोविड केंद्र येत्या दोन दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असून तेथे रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या केंद्राच्या तयारीचा आढावा बुधवारी प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी घेतला.
प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे यांनी चार केंद्रे दोन दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी उर्वरित सर्व कामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. याठिकाणी बेडची उपलब्धता, औषधाचा साठा, डॉक्टर्स व इतर स्टाफची नियुक्ती, ऑक्सिजन व्यवस्था तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना उप आयुक्त निखिल मोरे व आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ यांना दिल्या. गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांवर सचिवांमार्फत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ यांनी सदरच्या तिन्ही सेंटरवरील स्वच्छता व साफसफाई पूर्ण झाली असलेचे सांगितले. उप आयुक्त निखिल मोरे यांनी याठिकाणी पूर्वीचे असणारे सर्व साहित्य पूर्ववत त्याठिकाणी दोन दिवसात उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
यावेळी उप आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, प्रशासन अधिकारी शंकर यादव, प्रशासन वैद्यिकिय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. विद्या हेरवाडे, डॉ.अमोल माने, डॉ. संजना बागडी, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले, युवराज जबडे उपस्थित होते.