क्रिडाईच्या सहकार्याने ६० बेडचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:18+5:302021-05-15T04:23:18+5:30

कोल्हापूर : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत क्रिडाई कोल्हापूरने ...

Covid Center with 60 beds in collaboration with Kridai | क्रिडाईच्या सहकार्याने ६० बेडचे कोविड सेंटर

क्रिडाईच्या सहकार्याने ६० बेडचे कोविड सेंटर

Next

कोल्हापूर : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत क्रिडाई कोल्हापूरने लाईन बझार येथील महासैनिक ट्रेनिंग सेंटर येथे ६० ऑक्सिजन बेडचे कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटर सुरू केले असून सेंटर महानगरपालिकेकडे सुपुर्द व लोकार्पणाचा करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाला.

यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे, ,नगररचना सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन उपस्थित होते.

कोविड सेंटर मध्ये येणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुलभतेने व्हावा या करीता क्रिडाई कोल्हापूरच्या काही सभासदांनी ड्यूरा सिलिंडरसाठी भरीव सहकार्य करण्याचे ठरवले. सदर ड्यूरा सिलिंडर पालकमंत्री पाटील यांच्या सुपुर्द करण्यात आले. कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर व चेतन वसा, सचिव प्रदीप भारमल, खजानीस गौतम परमार, पदाधिकारी, क्रिडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव पारीख उपस्थित होते.

क्रिडाई कोल्हपूर ही बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असून बांधकाम व्यवसायिकांचे हित जोपासण्यांसह शहराचा विकास व सामाजिक उपक्रम संस्थेतर्फे राबविले आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर विषाणुंच्या संसर्गाने सगळ्या जगाला वेठीस धरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ओळखून विविध उपाय करण्यात येत आहेत.

ड्यूरा सिलिंडरसाठी सहकार्य करणारे सभासद -

१. सचिन ओसवाल - रामसिन्हा कन्स्ट्रक्शन २. संजय चव्हाण - वरद डेव्हलपर्स ३. विवेकानंद पाटील - अनंत इस्टेट डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्रा. ली. ४. राजीव पारिख -सूरज इस्टेट डेव्हलपर्स, ५. कृष्णात पाटील - श्री. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ६. अभिजीत मगदूम - भीमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ७. गिरीश रायबागे - रायसन कन्स्ट्रक्शन, ८. अजयसिह देसाई - अजयसिंह देसाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ९. श्रयांश मगदूम - एस. ए. मगदूम प्रोमोटर्स अँडबिल्डर्स, १०. राजेंद्र ओसवाल - मधुपुरी कन्स्ट्रक्शन, ११. जयेश कदम -महाभारत कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन, १२. अजय डोईजड -शिवशक्ती डेव्हलपर्स, १३. सुनील श्रीश्रीमाळ- ओम गणेश कन्स्ट्रक्शन, १४. महेश यादव - मयुरेश राजवर्धन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, १५. विद्यानंद बेडेकर - बेडेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.

(फोटो देत आहे)

Web Title: Covid Center with 60 beds in collaboration with Kridai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.