कोविड सेंटरने चांगली रुग्णसेवा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:24 AM2021-05-24T04:24:21+5:302021-05-24T04:24:21+5:30
जयसिंगपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा आरोग्य विभाग पूर्ण ताकदीने या संकटाला सामोरे जात आहे. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात ...
जयसिंगपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा आरोग्य विभाग पूर्ण ताकदीने या संकटाला सामोरे जात आहे. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही खासगी डॉक्टर्स एकत्र येऊन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करीत आहेत. या सेंटरमधून चांगली रुग्णसेवा द्यावी, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
जयसिंगपूर येथे रविवारी कोविड सेंटरचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री डॉ. यड्रावकर व उद्योजक शहाजीराव जगदाळे यांच्याहस्ते केले. यावेळी डॉ. अमरजित जगदाळे, डॉ. पांडुरंग खटावकर, महेश कलकुटगी, तेजस कुऱ्हाडे, अर्जुन देशमुख, डॉ. अकलंक चौगुले, पिंटू पाराज उपस्थित होते.
मंत्री यड्रावकर म्हणाले, आणखी काही दिवस चिंताजनक असणार आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो - २३०५२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ -
जयसिंगपूर येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, शहाजीराव जगदाळे, डॉ. पांडुरंग खटावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.