बाजार भोगाव आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:39+5:302021-03-07T04:21:39+5:30
बाजार भोगाव : कोविड-१९ लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत जिल्ह्यात १२० लसीकरण केंद्रांवर लस देण्यास सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा ...
बाजार भोगाव : कोविड-१९ लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत जिल्ह्यात १२० लसीकरण केंद्रांवर लस देण्यास सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना कोविड-१९ लस देण्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच बाबासो खोत, मानवाडचे लोकनियुक्त सरपंच फुलाजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कवठेकर, वैद्यकीय अधिकारी कारंडे, अमोल कांबळे उपस्थित होते. बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका, सेवक, आशा गटप्रवर्तक वैशाली पाटील, कर्मचारी परितकर आदींनी योग्य नियोजन करून व्याधीग्रस्त व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवली.
फोटो ओळ : बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लस प्रारंभप्रसंगी जि. प. सदस्य शंकर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अनिल कवठेकर, सरपंच बाबासो खोत.
०६ बाजार भोगाव लसीकरण