शिरोळ येथे दिव्यांगांना कोविड लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:44+5:302021-06-22T04:16:44+5:30
शिरोळ : जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, ग्रामीण रुग्णालय, शिरोळ नगरपालिकेच्या सहकार्याने शिरोळ तालुक्यातील दिव्यांगांसाठी विशेष कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात ...
शिरोळ : जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, ग्रामीण रुग्णालय, शिरोळ नगरपालिकेच्या सहकार्याने शिरोळ तालुक्यातील दिव्यांगांसाठी विशेष कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील प्रमुख उपस्थित होते. दर सोमवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत दिव्यांगांना लसीकरण देण्यात येणार आहे. याप्रसंगी जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. नीता माने, डॉ. कुंभोजकर, बजरंग काळे, तातोबा पाटील, भगवान कोळी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - २१०६२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांना कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, जि. प. समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तातोबा पाटील उपस्थित होते.