वडगावात ज्येष्ठांना कोविशिल्ड लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:22 AM2021-03-07T04:22:21+5:302021-03-07T04:22:21+5:30
कक्षांचा शुभारंभ आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यावेळी शिवराम जगदाळे, चित्रा जगदाळे यांना पहिली ...
कक्षांचा शुभारंभ आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी
यावेळी शिवराम जगदाळे, चित्रा जगदाळे यांना पहिली लस देऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. माजी नगराध्यक्ष विद्या पोळ, शोभा जाधव आदींसह दहा ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. यावेळी डाॅ. स्मिता कुडाळकर, डाॅ सूरज कुडाळकर, सचिन चव्हाण, शशिकांत पिसे, डाॅ. पूजा कोगनोळे, मीना चोपडे, रोहित पिसे, स्वागत लोंढे, अमोल नामे आदी उपस्थित होते.
दरम्यान, नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्यासह अन्य जेष्ठ नागरिकांनी लस घेतली. कोरोना लस ही पूर्ण सुरक्षित असून, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले. यावेळी नगरसेवक अजय थोरात, विजय झगडे, बाळासाहेब पाटील आदींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
फोटो ओळ : पेठवडगाव येथील कुडाळकर हाॅस्पिटलमध्ये कोविशिल्ड लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार राजू आवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सुरज कुडाळकर, डाॅ. स्मिता कुडाळकर, शिवराज जगदाळे, शशिकांत पिसे आदी उपस्थित होते.
०६ वडगाव लसीकरण