गाईच्या दुधाचा व्यवसाय आतबट्ट्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 06:15 AM2018-07-16T06:15:17+5:302018-07-16T06:15:19+5:30
दुभत्या गाईचे वाढलेले दर, महागलेले पशुखाद्य, वैरणीमुळे दूध व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे. एका वेताचा हिशेब मांडला तर उत्पादकाच्या पदरात गाईचे शेणही पडत नसून त्याला २३ हजारांचा तोटा होतो.
- राजाराम लोंढे
कोल्हापूर : दुभत्या गाईचे वाढलेले दर, महागलेले पशुखाद्य, वैरणीमुळे दूध व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे. एका वेताचा हिशेब मांडला तर उत्पादकाच्या पदरात गाईचे शेणही पडत नसून त्याला २३ हजारांचा तोटा होतो.
म्हशीच्या तुलनेत गाईचा भाकडकाळ कमी असल्याने अलीकडे उत्पादकांनी गाय दूध व्यवसायाकडे अधिक लक्ष दिले आहे. म्हशीच्या तुलनेत गाईचे संगोपन थोडे अवघड असते. त्यांची निगा काळजीपूर्वक राखावी लागते. त्यामुळे म्हैस दूध उत्पादनापेक्षा गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च अधिक येतो. त्यात दुभत्या गाईचे दर कमालीचे वाढले आहेत. जातिवंत गाईचे दर लाखापर्यंत पोहोचल्याने हळूहळू हा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. दोन महिन्यांपासून दूध संघांनी गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्याने उत्पादक चांगलाच अडचणीत आला आहे.
>एका वेतातील नफा-तोटा पत्रक
उत्पन्न
दूध उत्पादन फॅट प्रतिलिटर दर उत्पन्न (रुपये)
३५०० लिटर ४.० २३.९० रुपये ८३,६५०
चांगल्या संस्थेच्या १५ टक्के ८१९०० ७१५ टक्के १२,२८५ रुपये
नफ्यातून मिळणारा
दूध रिबेट
संघ दरफरक प्रतिलिटर
१.०५ रुपये ३५०० ७१.०५ ३,६७५ रुपये
एकूण उत्पन्न = ९९ हजार ६१० रुपये
> खर्च
खर्च एकूण खर्च
खाद्य - १७६५ किलो १७६५ किलो ७ १९.२० रुपये
= ३३ हजार ८८८ रुपये
एका वेतात लागणारी ९ टन ७ ५ हजार रुपये टन
वैरण - ९ टन = ४५ हजार रुपये
गुंतवणूक (एका गाईची किंमत- ६ हजार रुपये
६० हजार ७ १० टक्के)
औषधोपचार (वार्षिक २ हजार रुपये
औषधोपचार व रेतन)
मजुरी (एका मजुराची ३६५ दिवस ७ १०० रुपये
प्रतिदिनी शंभर रुपये) = ३६ हजार ५०० रुपये
एकूण खर्च = १ लाख २३ हजार ३८८