भाकप’उद्या केंद्र सरकारविरोधात काळा दिवस पाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:34+5:302021-05-25T04:26:34+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारचे धोरण शेतकरी व कामगार विरोधी असल्याच्या निर्षधार्थात ‘भाकप’च्या वतीने उद्या, बुधवारी काळे झेंडे लावून काळा ...
कोल्हापूर : केंद्र सरकारचे धोरण शेतकरी व कामगार विरोधी असल्याच्या निर्षधार्थात ‘भाकप’च्या वतीने उद्या, बुधवारी काळे झेंडे लावून काळा दिवस पाळण्यात येणार आहे.
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू होऊन २६ मे रोजी सहा महिने होत आहेत. कामगारांच्या देशव्यापी आंदोलनालाही सहा महिने पूर्ण आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊनही सात वर्षे पूर्ण होत आहे. या सात वर्षांत शेतकरी, शेतमजूर, कामगारांना मोदी सरकारने देशोधडीला लावले आहे. शेतकरी विरोधी कायदे परत घ्यावेत, यासह इतर मागण्यांसह केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी सामान्य जनता उद्या घरावर काळे झेंडे लावून काळा दिवस पाळतील. अशी माहिती ‘भाकप’चे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे यांनी पत्रकातून दिली.