सीपीआरमध्ये संगणकीय रुग्णालय व्यवस्थापन यंत्रणा आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:45+5:302021-07-16T04:17:45+5:30
या बैठकीबाबत अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, समितीने मुंबईनंतर सर्वाधिक चाचण्या कोल्हापूर जिल्ह्यात होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ...
या बैठकीबाबत अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, समितीने मुंबईनंतर सर्वाधिक चाचण्या कोल्हापूर जिल्ह्यात होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रत्येक विभागात ही यंत्रणा बसविल्यानंतर एका क्षणात प्रत्येक रुग्णाची आणि त्याच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे ती उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी साडेतीन कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे तसेच कोरोना रुग्णांमधील आयएलसिक्स ही रक्त तपासणी करण्यासाठी यंत्रणा आवश्यक असून त्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या दोन्हींचे प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे.
डॉ. सत्यजित साहू, डॉ. प्रदीप आवटे, डॉ.प्रणिल कांबळे यांनी सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून एकूणच येथील उपचार पद्धती, रुग्ण व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती घेतली. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बरगे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. अजित लोकरे, डॉ. संगीता कुंभोजकर यांच्याकडून या पथकाने ही माहिती घेतली.
चौकट
तीन आठवड्यांत संसर्ग होईल कमी
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा प्रभाव उशिरा सुरू झाला. त्यामुळे ती उशिरा ओसरणार हे निश्चित आहे. येत्या तीन आठवड्यांत आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवू, असे डॉ. एस. एस. मोरे यांनी सांगितले. मोठ्या संख्येने असलेल्या कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
चौकट
रुग्णशोध आवश्यक
अधिकाधिक चाचण्यांबद्दल समाधान व्यक्त करतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरी आणि ग्रामाीण भागात रुग्णशोध मोहीम राबवून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज यावेळी पथकाने व्यक्त केली.