'सीपीआर' रुग्णालयाच्या विश्वासार्हतेसह रुग्णसंख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 02:21 PM2021-12-29T14:21:07+5:302021-12-29T14:38:09+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे तसेच सर्वोपचार रुग्णालय म्हणून सीपीआरला दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे रुग्णालयातील मिळणाऱ्या उपचाराबाबत सर्वसामान्य रुग्णांच्या मनात एक विश्वासार्हता निर्माण झाली आहे.

CPR status as the largest and general hospital in Kolhapur district | 'सीपीआर' रुग्णालयाच्या विश्वासार्हतेसह रुग्णसंख्या वाढली

'सीपीआर' रुग्णालयाच्या विश्वासार्हतेसह रुग्णसंख्या वाढली

googlenewsNext

भारत चव्हाण

कोल्हापूर : स्वस्त दरात आणि खात्रीशीर उपचार होत असल्याचा रुग्णांच्या मनातील विश्वास आणि कोविडकाळात अतिशय चांगली कामगिरी करुन संपादन केलेली विश्वासार्हता यामुळे येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय (सीपीआर) रुग्णालयातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. २०२१ सालातील सीपीआर रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) नोंद झालेल्या ६६ हजार २७९ रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मेडिसीन विभागाचे आहेत. त्याखालोखाल अस्थिरोग, नेत्र तसेच सर्जरी विभागााचे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे तसेच सर्वोपचार रुग्णालय म्हणून सीपीआरला दर्जा मिळालेला आहे. जिल्हा रुग्णालय म्हणून त्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी किफायतशीर दरात खात्रीशीर उपचार होत असल्याने रुग्णांचा ओढा जास्त आहे. विशेष म्हणजे पूर्वी सीपीआर म्हणजे नागरिक नाकं मुरडायचे. परंतु कोरोनाकाळात या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच नर्सिंग स्टाफने अतिशय चांगले काम केले होते. त्यामुळे रुग्णालयातील मिळणाऱ्या उपचाराबाबत सर्वसामान्य रुग्णांच्या मनात एक विश्वासार्हता निर्माण झाली आहे.

कोविडकाळात सीपीआरमध्ये केवळ कोरोनाबाधित रुग्णांवरच उपचार केले जात होते. एप्रिल २०२१ पासून पुन्हा रुग्ण वाढायला लागले तसे पुढे सर्वसाधारण रुग्णांसाठी ते बंद करण्यात आले. मे, जून , जुलै व ऑगस्ट अशा चार महिन्यांत केवळ कोविड रुग्णांवर उपचार केले गेले. आठ महिन्यांत सीपीआरमध्ये ६६ हजार २७९ रुग्णांची ओपीडीला नोंद झाली. 

सीपीआर रुग्णालयावर असलेला रुग्णांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चांगली रुग्णसेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोनाच्या काळात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या पण आता कोरोना कमी झाल्यामुळे प्राधान्याने शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. दिव्यांगबांधवांना प्रमाणपत्रे देण्याचेही काम सुरू ठेवले आहे. - डॉ. गिरीष कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर रुग्णालय

 

सर्वाधिक चाललेल्या ओपीडीचा आढावा -

महिना मेडिसीनसर्जरीऑर्थोपेडिकईएनटीडेन्टिसआयपेडियाट्रिकस्कीन
जानेवारी२३४११६२४२२५०१४२४१९४ २०५४ २८८९३५
फेब्रुवारी२९४०१६८२२३४८१५८०२६१२१७९३७२९४३
मार्च२७२३ १६९२२३१०१४९१३४९२११७ ४४३१०१३
एप्रिल४७८३९२ ५६०२५२ ६५४५६१०४२१३
सप्टेंबर २३७१७०-१८१ २५१५३३१६६
आक्टोंबर१७३४१४८७१०९६ १२१५२९०३००३५७७१३
नोव्हेंबर१८२०१७४८१६९५११४१ २८२१८८६४४७७३८
डिसेंबर२२६५१७४९ १८६११२५३३०० १६५१४१०८६५

( सीपीआर हॉस्पिटल मे, जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्यांसाठी कोविड रुग्णांसाठी आरक्षित होते.)

Web Title: CPR status as the largest and general hospital in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.