माकडतापाच्या उपचारासाठी सीपीआरचे पथक सरसावले
By admin | Published: March 5, 2017 11:51 PM2017-03-05T23:51:28+5:302017-03-05T23:51:28+5:30
कोकणातील साथ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात काम
गणेश शिंदे ल्ल कोल्हापूर
सिंधुदुर्ग जिल्ह्णातील सावंतवाडी, दोडामार्ग या परिसरात डोके वर काढलेल्या माकडताप (कॅसनूर फॉरेस्ट डिसीज) या दुर्मीळ आजारावरील उपचारांसाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) आणि राजर्र्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दोन पथके रवाना झाली.
सध्या माकडताप या आजाराचे
१ जानेवारी २०१७ ते आजअखेर ६६ रुग्ण सावंतवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल आहेत; तर आतापर्यंत या आजाराने पाचजण दगावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने खबरदारी म्हणून लोकशिक्षणाद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
भारतात माकडताप आजाराचा पहिला रुग्ण हा शिमोगा जिल्ह्यात (कर्नाटक) येथे १९५७ ला आढळला. त्यानंतर याची व्याप्ती हळूहळू वाढू लागली. विशेषत: जंगलाच्या परिसरात या माकडताप आजाराचा फैलाव होतो. गेल्या सव्वादोन महिन्यांत गोवा सीमारेषेवरील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी या परिसरातील पाचजण दगावले आहेत; तर ६६ रुग्ण सध्या दाखल आहेत. बीडशी, तळकट, बांदा परिसरातील माकडतापाचे रुग्ण आहेत. मात्र, हा आजार बरे होण्यासाठी विशेष असे औषध नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले. गतवर्षी माकडताप आजाराचे रुग्ण कमी होते; पण यंदा या आजाराने डोके वर काढले आहे. एखाद्याला ताप आल्यावर त्याचे रक्त नमुन्यासाठी घेतले जाते. ते तपासण्यासाठी पुण्यातील ‘नॅशनल इन’या राष्ट्रीय प्रयोगशाळेत तसेच मणिपाल येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. १५ ते २० जणांचे वैद्यकीय पथक, फिजिओथेरपीची पथके कार्यरत आहेत. याची खबरदारी म्हणून सिंधुदुर्ग प्रशासनात जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे.
दुर्मीळ आजार...
जंगली भागात विषाणूमुळे होणारा हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे याची व्याप्ती याच परिसरात वाढते. माकडताप हा दुर्मीळ आजार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले.
लक्षणे...
४तीव्र ताप, डोके दुखणे, जुलाब होणे
४अतिरक्तस्राव (नाकातून, छातीतून आणि अंगावर लाल पुरळ येणे.)