परीख पुलाच्या पर्यायांचे आराखडे तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 04:57 PM2019-07-25T16:57:58+5:302019-07-25T17:00:50+5:30
साईक्स एक्स्टेन्शन येथील बाबुभाई परीख पुलाला सुचवण्यात आलेल्या पर्यायांचा अभ्यास करून तातडीने आराखडे व खर्चाचे अंदाजपत्रके तयार करावीत, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
कोल्हापूर : साईक्स एक्स्टेन्शन येथील बाबुभाई परीख पुलाला सुचवण्यात आलेल्या पर्यायांचा अभ्यास करून तातडीने आराखडे व खर्चाचे अंदाजपत्रके तयार करावीत, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
परीख पुलासंदर्भात स्थापन झालेल्या कृती समिती सदस्यांनी गुरुवारी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली. परीख पुलाखालून होणारी वाहतूक अपुरा रस्ता आणि सांडपाण्याचा निचरा होण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली.
परीख पुलाखालून होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे तसेच तेथे सांडपाणी तुंबत असल्यामुळे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी काय केले पाहिजे याचा अभ्यास केला असून, त्यातून काही पर्याय आमच्यासमोर आले असल्याचे कृती समितीचे अजय कोराणे यांनी आयुक्तांना सांगितले.
यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, संजय मोहिते यांच्यासह महेश दिघे, हंबीरराव मुळीक, महादेव पाटील, फिरोज शेख, सुशील हंजे, हिदायत मुल्ला, एस. के. माळी, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, राहुल पाटील, प्रवीणचंद्र वायचळ, बळीराम महाजन उपस्थित होते.