‘हृदयस्पर्शी’ साहित्याची निर्मिती व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:59 AM2018-01-22T00:59:26+5:302018-01-22T01:00:08+5:30
कोल्हापूर : मन हे हृदयाच्या स्थानी असते. त्यामुळे साहित्य हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. अशा चांगल्या साहित्यातून समाजाची उन्नती घडते, असे प्रतिपादन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांनी रविवारी केले.
कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्या विद्यमाने आयोजित विभागीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मनस्विनी प्रभूणे, डॉ. रमेश जाधव, संजीवनी तोफखाने उपस्थित होत्या.
शंकराचार्य म्हणाले, केवल साहित्य अजरामर होऊन चालत नाही तर साहित्यिकही अजरामर झाला पाहिजे साहित्यात सर्व रस असतात पण ते कोणत्या अर्थाने वापरायचे हे प्रत्येकावर अवलंबून असते. संकेताप्रमाणे ‘शब्द’ वापरले तर ते अर्थासह प्रभावी ठरतात. आजच्या साहित्यात ज्ञानोपासक दिसत नाहीत. ज्ञान आत्मसात करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे.
डॉ. ल. रा. नसिराबादकर म्हणाले, या साहित्य संमेलनातून साहित्यप्रेमी व रसिकांचा सुंदर मेळ साधला आहे. संमेलनातून आपल्याला साहित्यांचे विविध पैलू उलगडता येतात.
दरम्यान, साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात डॉ. आशुतोष देशपांडे यांनी सुनील पाटील यांची मुलाखत घेतली. दुसºया सत्रात झालेल्या परिसंवादात ‘सामाजिक जीवनात ग्रंथालयांचे स्थान’ या विषयावर डॉ. एस. इनामदार यांनी ग्रंथालयांच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. प्रकाश कल्लोळी मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी पालकांनी सजग राहायला हवे. ई-ग्रंथालय ही नवीन संकल्पना आत्मसात केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तिसºया सत्रात परिसरातील साहित्यिक व साहित्य संस्था या विषयावर झालेल्या परिसंवादास भारत सरकारच्या भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते उपस्थित होते. यावेळी डॉ. पी. जी. कुलकर्णी, प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी ‘साहित्य परंपरा’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी रजनी हिरळीकर होत्या. चौथ्या सत्रात झालेल्या कवी संमेलनात सुखदा कु लकर्णी, किरण चव्हाण, जगदीश पाटील, डॉ. दिनेश फडणीस, गुरुनाथ हिर्लेकर, सुरेखा वाडकर, इशा इनामदार, मृदुला बापट, दीपाली चव्हाण, किरण चव्हाण यांनी काव्य सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी मीरा सहस्त्रबुद्धे होत्या. दीपक गाडवे यांनी प्रास्ताविक केले. आशुतोष देशपांडे यांनी परिचय करून दिला. श्रीकृष्ण साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.