मतदान केंद्रांसाठी कार्यप्रणाली तयार करा :  जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 06:32 PM2020-11-09T18:32:59+5:302020-11-09T18:34:52+5:30

कोल्हापूर : विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर कोविडच्या अनुषंगाने सुयोग्य सॅनिटायझेशन, मास्क, ...

Create working system for polling stations: Collector Daulat Desai | मतदान केंद्रांसाठी कार्यप्रणाली तयार करा :  जिल्हाधिकारी दौलत देसाई

मतदान केंद्रांसाठी कार्यप्रणाली तयार करा :  जिल्हाधिकारी दौलत देसाई

googlenewsNext
ठळक मुद्दे मतदान केंद्रांसाठी कार्यप्रणाली तयार करा :  जिल्हाधिकारी दौलत देसाईपुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

कोल्हापूर : विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर कोविडच्या अनुषंगाने सुयोग्य सॅनिटायझेशन, मास्क, थर्मल गन, रुग्णवाहिका व सुयोग्य औषधसाठा याबाबत मानक कार्यप्रणाली तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले.

पुणे पदवीधर व शिक्षक द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, विशेष भूसंपादन अधिकारी हेमंत निकम, जिल्हा खनीकर्म अधिकारी अनिल थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, मतदान केंद्र, त्यांना आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत नियोजन करावे. ५० पेक्षा जास्त गर्दी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. परिवहन विभागाने केंद्रनिहाय लागणाऱ्या वाहनांबाबत नियोजन करावे. भरारी पथके, टपाली मतपत्रिका यासाठी समन्वय करावा. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोविडच्या अनुषंगाने मतदान केंद्रनिहाय एसओपी तयार करावी. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील याबाबत दक्ष राहावे. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने निवडणुकीची तयारी करावी.
----

फोटो कोलडेस्क ला कलेक्टर बैठक नावाने पाठविला आहे
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पुणे पदवीधर व शिक्षक द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

Web Title: Create working system for polling stations: Collector Daulat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.