मान्सूनला पोषक हवामान तयार, सर्वांच्या नजरा मान्सूनकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 02:08 PM2020-06-11T14:08:49+5:302020-06-11T14:15:31+5:30

मान्सूनने कर्नाटक, तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापला असून, तो महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. जूनचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत.

Creating a nutritious climate for the monsoon | मान्सूनला पोषक हवामान तयार, सर्वांच्या नजरा मान्सूनकडे

मान्सूनला पोषक हवामान तयार, सर्वांच्या नजरा मान्सूनकडे

Next
ठळक मुद्देमान्सूनला पोषक हवामान तयारसर्वांच्या नजरा मान्सूनकडे

कोल्हापूर : मान्सूनने कर्नाटक, तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापला असून, तो महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. जूनचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत.

जूनचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला. या वर्षी वेळेत आगमन झाल्याने तो ७ ते ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र अद्याप तो कर्नाटक व तमिळनाडूमध्येच थबकला आहे. त्याने या दोन्ही राज्यांचा बहुतांश भाग व्यापला असून, मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सध्याची स्थिती विचारात घेता राज्यात १२ जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल. त्यामुळे सर्वत्र दमदार पाऊस होऊन १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यभरात मान्सूनची वृष्टी सुरू होईल. तळकोकणातून पुढे सरकताना पुणे व नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल, असाही इशारा देण्यात आला आहे़

राधानगरी धरणात ४८.९९ दलघमी पाणीसाठा, कोयनेतून २१०० क्युसेक विसर्ग

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.९९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजटाच्या अहवालानुसार कोयना धरणातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४० दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०७.४६ दलघमी, कासारी २५.२२ दलघमी, कडवी २९.६९ दलघमी, कुंभी २७.८० दलघमी, पाटगाव २४.८८ दलघमी, चिकोत्रा १३.९३ दलघमी, चित्री १३.०५ दलघमी, जंगमहट्टी ७.१२ दलघमी, घटप्रभा ११.४४ दलघमी, जांबरे ५.४१ दलघमी, कोदे (ल पा) १.०३ दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे

राजाराम १०.८ फूट, सुर्वे १०.४ फूट, रुई ३८ फूट, तेरवाड ३२.६ फूट, शिरोळ २६.३ फूट, नृसिंहवाडी २१.६ फूट, राजापूर ११ फूट तर नजीकच्या सांगली ५ फूट व अंकली ५.११ फूट अशी आहे.


 

Web Title: Creating a nutritious climate for the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.