गावागावात जलसाठे निर्माण करणार : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:50 PM2017-08-16T16:50:44+5:302017-08-16T16:55:38+5:30
कोल्हापूर : जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे प्राधान्यक्रमाचे अभियान असून ते यापुढेही अधिक प्रभावीपणे राबवून गावागावात जलसाठे निर्माण करुन गावे जलसमृध्द बनविण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन असल्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथे राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची राज्याचे कृषि राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी पाहणी करुन सिमेंट नालाबांधातील पाण्याचे पूजन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडीक, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबा देसाई, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कृषि सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते कृषि यांत्रिकीकरणातून शेतकºयांना ट्रॅक्टर व पॉवर टेलरचे वितरण करण्यात आले.
कळंबे तर्फ ठाणे येथे कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविलेल्या जलसंधारणाच्या विविध प्रणालींची पाहणी करुन मंत्री खोत यांनी समाधान व्यक्त केले. शेतकºयांसाठी शासन अनेकविध योजना आणि उपक्रम राबवित असून या कृषिविषयक योजना शेतकºयांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम कृषि अधिकाºयांनी करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. कृषि विभागामार्फत उन्नत शेती -समृध्द शेतकरी ही मोहिमही शेतकºयांसाठी अतिशय उपयुक्त असून ही मोहिम कृषि विभागाने अधिक गतीमान करावी असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा अधिक्षक कृषिअधिकारी बसवराज मास्तोळी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबे तर्फ ठाणे येथे जलसंधारण प्रणालीची विविध १८ कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये शेततळी, सिमेंट नालाबांध खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, सलग समतल चर, साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध खोलीकरण व रुंदीकरण, गाव तलावातील गाळ लोकसहभागातून काढणे, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
यावेळी पाटबंधारे विभागाचे कायर्कारी अभियंता संग्राम पाटील, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुयर्वंशी, उपविभागीय कृषि अधिकारी रविंद्र पाठक यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.