कोविड सेंटर उभे करण्याबाबत श्रेयवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:27 AM2021-05-25T04:27:57+5:302021-05-25T04:27:57+5:30
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे एक गाव आणि एक राव यांच्यामुळे गावातील कोविड सेंटरला राजकारणाचे ग्रहण लागले आहे. ...
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे एक गाव आणि एक राव यांच्यामुळे गावातील कोविड सेंटरला राजकारणाचे ग्रहण लागले आहे. माजी उपसरपंच कृष्णात मसूरकर कोविड सेंटर उभारत आहेत तर पंचायत समिती सदस्य अरुण माळी गावातील देणगीदार व ग्रामस्थांच्या मदतीने आयसोलेशन कोविड सेंटर उभारत आहेत. त्यामुळे गाव कोरोना संसर्गाच्या महामारीने चिंतीत असताना कोविड सेंटरच्या राजकारणामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
पट्टणकोडोली हे गाव ३५ हजार लोकसंख्येचे असून, गावामध्ये १७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर आठजणांचा मृत्यू झाला आहे. पंचायत समिती सदस्य अरुण माळी यांनी देणगीदार व ग्रामस्थांच्या पुढाकारातून कोविड सेंटर उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी गावातील प्रमुखांना सोबत घेऊन त्यांनी कोविड आयसोलेशन सेंटर सुरु केले आहे. मात्र, माजी उपसरपंच कृष्णात मसूरकर यांनी ‘गाव एकीकडे आणि राव एकीकडे’ या उक्तीप्रमाणे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे गावातील राजकारण या कोविड सेंटरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे गाव कोरोनाच्या संकटात असताना राजकारण करणार्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.