दानोळीतील १४00 जणांवर गुन्हे शासकीय कामात अडथळा : ९0 जणांची नावे निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:24 AM2018-05-04T00:24:06+5:302018-05-04T00:24:06+5:30

जयसिंगपूर : इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दानोळी (ता. शिरोळ) येथील ९0 जणांसह १४०० अज्ञातांवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

 Crime against 1400 people in Denolie obstructed government work: 90 names were named | दानोळीतील १४00 जणांवर गुन्हे शासकीय कामात अडथळा : ९0 जणांची नावे निष्पन्न

दानोळीतील १४00 जणांवर गुन्हे शासकीय कामात अडथळा : ९0 जणांची नावे निष्पन्न

Next
ठळक मुद्देगावात तणावपूर्ण शांतता

जयसिंगपूर : इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दानोळी (ता. शिरोळ) येथील ९0 जणांसह १४०० अज्ञातांवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे, सर्जेराव शिंदे, रावसाहेब भिलवडे, रामा शिंदे, गब्रू गावडे, मानाजीराव भोसले, बापूसो दळवी, सुकुमार पाटील, सुजाता शिंदे, सतीश मलमे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इचलकरंजी नगरपालिकेचे जलअभियंता अजय विश्वासराव साळुंखे यांनी पोलिसांत तक्रार दिली.
बुधवारी (दि. ०२) दानोळी (ता. शिरोळ) येथे इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या कामाची सुरुवात करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस फौजफाटा गेला होता. यावेळी शिवाजी चौकात संशयित आरोपींनी त्यांना रोखले. शासकीय कामात अडथळा आणून योजनेचे काम करण्यास गेलो असताना रस्त्यात टायरी पेटवून रस्ता अडविला. शिवाय दुकाने बंद ठेवून आर्थिक नुकसान करण्यात आले. नदीकडे जाणाºया मार्गावर दगडांचा बांध टाकून रस्ता बंद करण्यात आला होता. जिल्हाधिकाºयांच्या बंदी आदेशाचाही भंग करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण, छायाचित्रे प्रसारित केल्यामुळे संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे यांनी दिली.
दरम्यान, या घटनेत सुमारे
९0 जणांची नावे निष्पन्न झाली असून, अटकसत्र मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वारणेप्रश्नी आमदारांचे पर्यावरणमंत्र्यांना साकडे
शिरोळ : पंचगंगा नदी प्रदूषण करणाºया घटकांकडे डोळेझाक करणाºया प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. तर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी पोलीस बळाचा वापर करून दानोळी येथे वारणा योजनेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. पर्यावरण विभागाकडून प्रदूषणाबाबत अहवाल घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये, असे आदेश संबंधितांना द्यावेत, अशीही मागणी आमदार पाटील यांनी पर्यावरणमंत्री कदम यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी त्याचबरोबर सांगली व मिरज महापालिकेचे दूषित पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्याचा फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे. वारणा पाणी बचाव कृती समिती व ( पान ४ वर)
फौजफाटा तळ ठोकून
आता माघार नाही : धनवडे
दानोळी येथील वारणा बचाव कृती समितीच्यावतीने गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. बुधवारच्या घटनेनंतर दानोळी येथे गुरुवारी तणावपूर्ण शांतता होती. तर आमच्यावर गुन्हे दाखल करणाºयांनी कोणत्या सरकारी कामात अडथळा आणला हे दाखवून द्यावे. गावामध्ये दहा हजार समितीचे कार्याध्यक्ष आहेत. आम्हाला बंदिस्त ठेवावे. आता माघार नाही, अशी भूमिका वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे यांनी व्यक्त केली.

उमळवाड, कवठेसार कोथळीत कडकडीत बंदउदगाव / दानोळी : वारणेचे पाणी इचलकरंजीला देणार नाही, या दानोळीकरांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरुवारी शिरोळ तालुक्यातील कोथळी, उमळवाड, कवठेसार या गावांमधील व्यवहार बंद ठेवून शासनाच्या विरोधात निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये सरपंच व गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यासह परिसरातील गावांमधूनही आंदोलनाला बळ मिळत आहे.
कोथळीत गुरुवारी सकाळी रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. ‘पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात आल्या. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून अमृत योजनेला विरोध दर्शविला. यावेळी सरपंच अमृता पाटील-धडेल, उपसरपंच सागर पुजारी, संजय नांदणे, शीतल पाटील-धडेल, रावसो बोरगावे, सुकुमार नेजकर यांच्यासह ग्रामस्थ रॅलीत सहभागी झाले होते. तर उमळवाड येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास गावातून रॅली काढून व्यवहार बंद ठेवले. उदगावच्या जि. प. सदस्या स्वाती सासणे व शिवसेनेचे नेते भरत वरेकर यांनी वारणा बचाव कृती समितीला उदगावकरांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. कवठेसार येथे सकाळी नऊच्या सुमारास गावातून रॅली काढून अमृत योजनेला विरोध दर्शविला. सर्व व्यवहार दिवसभर बंद होते. यावेळी पोपट भोकरे, संदीप कांबळे, अमित पाटील, सुधाकर भोसले, राहुल भोकरे, भोला लतिफ, सर्जेराव गाडवे, भरत तेरदाळे, संजय चंदोबा उपस्थित होते.

Web Title:  Crime against 1400 people in Denolie obstructed government work: 90 names were named

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.