गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या विकास खुडेसह पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:26 PM2020-09-16T19:26:19+5:302020-09-16T19:27:37+5:30
तवलेल्या पैशांवर ठरल्याप्रमाणे अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर येथील ग्रीन ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रोडक्टस लिमिटेडचा मुख्य कार्यकारी संचालक संशयित विकास जयसिंग खुडे व मुख्य कार्यकारी अधिकारी असलेली त्याची पत्नी विद्या विकास खुडे हिच्यासह तीन संचालकांवर मंगळवारी रात्री गुन्हा नोंद झाला.
कोल्हापूर : गुंतवलेल्या पैशांवर ठरल्याप्रमाणे अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर येथील ग्रीन ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रोडक्टस लिमिटेडचा मुख्य कार्यकारी संचालक संशयित विकास जयसिंग खुडे व मुख्य कार्यकारी अधिकारी असलेली त्याची पत्नी विद्या विकास खुडे हिच्यासह तीन संचालकांवर मंगळवारी रात्री गुन्हा नोंद झाला.
अन्य संशयितांमध्ये संचालक प्रसाद आनंदराव पाटील (शिवाजी पेठ, उभा मारुती चौक), सुशील शिवाजी पाटील (यवलूज, ता.पन्हाळा), डॉ. तुकाराम शंकर पाटील (माजगाव, ता पन्हाळा) यांचा समावेश आहे. या प्रकरणी राजू बळिराम सूर्यवंशी (वय ४८, लक्षतीर्थ वसाहत) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हीनस कॉर्नर येथील मातोश्री प्लाझा येथे संशयित खुडे याची ग्रीन ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रोडक्टस लिमिटेड या गुंतवणूक कंपन्या आहेत .त्याने नोकरी अधिक नफ्याची अमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांकडून २०१९ पासून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आपल्या कंपनीत करून घेतली आहे. त्याने ही गुंतवणूक केल्याप्रमाणे आणि दिलेल्या हमीप्रमाणे परतावा न देता ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा अपहार केला.
याबाबत सूर्यवंशी यानी खुडे दाम्पत्यासह तीन संचालकांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसानी या पाचजणांविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम ( एमपीआयडी ) १९९९चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोद केला. तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड करीत आहेत.