पेठवडगावात गोवंश जनावरांच्या कत्तल प्रकरणी चौघांवर गुन्हा : दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:31 AM2021-09-16T04:31:28+5:302021-09-16T04:31:28+5:30
याप्रकरणी सद्दाम महमद बेपारी, शफिक बेपारी, हुसेन राजेसाब बेपारी(सर्व रा. बेपारी गल्ली, पेठवडगाव), मुल्ला गुडूसाब बेपारी (वय ४५, रा. ...
याप्रकरणी सद्दाम महमद बेपारी, शफिक बेपारी, हुसेन राजेसाब बेपारी(सर्व रा. बेपारी गल्ली, पेठवडगाव), मुल्ला गुडूसाब बेपारी (वय ४५, रा. कागवाड, ता. अथनी, जि. बेळगाव, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सद्दाम बेपारी, मुसा बेपारी या दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी दीड वाजण्यास सुमारास करण्यात आली. याबाबत फिर्याद पोलीस अंमलदार अशोक जाधव यांनी दिली.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : येथील बेपारी वसाहतीमध्ये सद्दाम बेपारी यांच्या घरात गोवंश जनावरांचे मांस असल्याचा संशय असून, डांबून ठेवलेली गायी, तर दोघेजण मांस तोडण्यासाठी आले होते. तसेच जनावरांचे मांस, देशी गाय व वासरे पोलिसांनी जप्त केली. तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत. दरम्यान, चार टन मांस पालिकेच्या कचरा डेपोत विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. याबाबत न्यायालयाच्या परवानगीने उद्या विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे समजते.
लाभार्थी कोण ?
शहरातील बेपारी गल्लीत उघडपणे जनावरांचा बेकायदेशीर कत्तलखाना सुरू होता. यासाठी कोणी कोणी पाठबळ दिले त्यांचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.