वडणगेत मारहाणीप्रकरणी एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:34+5:302021-01-23T04:23:34+5:30
कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) साकळकर गल्ली येथे पत्नीला शिवीगाळ का केली, याचा जाब विचारल्याबद्दलचा राग मनात धरून एकाला ...
कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) साकळकर गल्ली येथे पत्नीला शिवीगाळ का केली, याचा जाब विचारल्याबद्दलचा राग मनात धरून एकाला मारहाण करण्यात आली. याबाबतची फिर्याद प्रशांत तुकाराम कुंभार (वय २७, रजपूतवाडी, करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार राजेंद्र यशवंत कुंभार (रा. साकळकर गल्ली, वडणगे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी प्रशांत कुंभार यांच्या पत्नीला त्यांचे मामा राजेंद्र यांनी शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी ते गेले असता, संशयित राजेंद्र यांनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पहारीने मारहाण केली.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरातून मोटारसायकल लंपास,
कोल्हापूर : कसबा बावडा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात उभी केलेली मोटारसायकल चोरट्याने लांबवली. याबाबतची फिर्याद पांडुरंग शामराव बांबरस (वय ३९, रा. पिंजार गल्ली, कसबा बावडा, मूळ मुंबई) यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी बांबसर यांनी आपली मोटारसायकल मंगळवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा ग्राहक न्यायालयासमोर उभी केली होती. आपले काम आटोपल्यानंतर ते मोटारसायकल घेण्यासाठी गेले असता, त्यांना मोटरसायकल जागेवर नसल्याचे दिसले.