राजेश लाटकरसह भावांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:07+5:302021-03-04T04:44:07+5:30

कोल्हापूर : संगणकाच्या व्यवसायातील थकीत उधारी मागण्यास गेलेल्या प्रदीप जगताप यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी ...

Crime against Rajesh Latkar and his brothers | राजेश लाटकरसह भावांवर गुन्हा

राजेश लाटकरसह भावांवर गुन्हा

googlenewsNext

कोल्हापूर : संगणकाच्या व्यवसायातील थकीत उधारी मागण्यास गेलेल्या प्रदीप जगताप यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी दुपारी शिवाजी पार्कमध्ये घडला. याप्रकरणी स्थायी समितीचे माजी सभापती राजेश भरत लाटकर व शैलेश लाटकर (दोघेही रा. शिवाजी पार्क) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजारामपुरीतील कोरगावकर हाैसिंग सोसायटीमध्ये प्रदीप प्रकाश जगताप (वय ५०) हे राहतात. त्यांचा संगणक विक्रीचा व्यवसाय आहे. जगताप यांचा शैलेश लाटकर यांच्याशी संगणक खरेदीचा व्यवहार झाला होता. त्या व्यवहारातील उधारीचे राहिलेले पैसे मागण्यासाठी जगताप हे सोमवारी दुपारी साडेचार वाजता लाटकर यांच्या शिवाजी पार्कमधील घरी गेले होते. त्यावेळी शैलेश लाटकर व राजेश लाटकर या भावांनी त्यांना तुझे कसले पैसे असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जगताप यांनी सोमवारी मध्यरात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार लाटकर बंधूंवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Crime against Rajesh Latkar and his brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.