भटक्या कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:35 IST2021-04-28T18:34:29+5:302021-04-28T18:35:19+5:30
Crimenews Kolhapur : भटक्या कुत्र्यांना फायबर पाईप, लोखंडी सळई व दगडाने मारून विकलांग केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तिघांवर मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविला आहे. अनुप मोहन सातारकर, अमित मोहन सातारकर, जोसना मोहन सातारकर (सवर रा. ओम गणेश कॉलनी, संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

भटक्या कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा
कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांना फायबर पाईप, लोखंडी सळई व दगडाने मारून विकलांग केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तिघांवर मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविला आहे. अनुप मोहन सातारकर, अमित मोहन सातारकर, जोसना मोहन सातारकर (सवर रा. ओम गणेश कॉलनी, संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारकर बंधूंनी संभाजीनगर परिसरातील ओम गणेश कॉलनी फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना लोखंडी पाईप, फायबर पाईप, दगडाने मारहाण केली होती. त्यांच्या मारहाणीमुळे भटकी कुत्री विकलांग झाली होती.
ही घटना दि. ३ मार्च ते ४ एप्रिल २०२१ या दरम्यान घडली. याबाबत ओम गणेश कॉलनीतील वर्षा रमेश सोनुले (५०) यांनी तिघा सातारकर बंधू विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला.