युवतीवर अत्याचार, इंद्रजित पठाडे याच्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:16 PM2019-03-12T13:16:34+5:302019-03-12T13:17:32+5:30
इंटेरियर डिझाईनचा कोर्स करणाऱ्या युवतीला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण व मारहाण करून अत्याचार केल्याप्रकरणी संशयित इंद्रजित धनंजय पठाडे (वय २३, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर)याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक मार्चला गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर : इंटेरियर डिझाईनचा कोर्स करणाऱ्या युवतीला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण व मारहाण करून अत्याचार केल्याप्रकरणी संशयित इंद्रजित धनंजय पठाडे (वय २३, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर)याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात एक मार्चला गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला आहे. त्याने मोबाईल बंद ठेवल्याने लोकेशन मिळत नाही आहे. त्याने अपहरणासाठी वाहन व पिस्तुल कोणाचे वापरले, हे तो सापडल्यानंतर पुढे येणार आहे. दरम्यान संशयितास अटक करावी अशी मागणी ताराराणी महिला आघाडीच्यावतीने गृह पोलिस उपअधीक्षक सतिश माने यांच्याकडे सोमवारी करण्यात आली. यावेळी हेमा कुलकर्णी, सविता सरदार, लक्ष्मी हक्के आदी उपस्थित होत्या.
पोलिसांनी सांगितले,‘इंगळेनगर येथे राहणाऱ्या पीडित युवतीची आणि संशयित इंद्रजित पठाडे याची फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर दोघेही मित्र झाले. संशयिताचा स्वभाव चांगला नसल्याचे समजल्यानंतर संबंधीत युवती त्याला टाळू लागली; परंतु त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केला.
युवती एका उद्योजकांची मुलगी आहे. अत्याचार वाढू लागल्याने तिने या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. त्यांनी तिला धीर देत शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच संशयित इंद्रजित पसार झाला. त्याने मोबाईलही बंद ठेवला आहे. या प्रकाराने पीडित युवतीसह तिच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ करत आहेत.’