क्राईम संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:23 AM2020-12-31T04:23:24+5:302020-12-31T04:23:24+5:30
कोल्हापूर : येथील राजारामपुरी तिसऱ्या गल्लीमध्ये मोबाईलवरून मटका घेणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथकाने ताब्यात घेतले. विराजकुमार सोनवले ...
कोल्हापूर : येथील राजारामपुरी तिसऱ्या गल्लीमध्ये मोबाईलवरून मटका घेणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथकाने ताब्यात घेतले. विराजकुमार सोनवले (३१, रा. विक्रमनगर) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून रोकडसह मोबाईल असा १० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मालकासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे विराज सोनवलेसह मालक किरण पाटील (रा. उचगाव), सुजित साठे, प्रदीप गुरव, महेश निपाणीकर अशी आहेत.
राजारामपुरी तिसऱ्या गल्लीत मोबाईलवरून एकजण मटका घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयितास ताब्यात घेतले. त्याने स्वत:चे नाव विराज सोनवले असून मटका मालक किरण पाटील असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवार पेठ परिसरातील रंग विक्रेत्यावर गुन्हा
कोल्हापूर : एका रंगांच्या कंपनीच्या परवानगीशिवाय त्या कंपनीच्या नावे रंग विक्री करून कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगळवार पेठ परिसरातील एका विक्रेत्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वैभव विनायक भाेसले (रा. शांतीनगर, पाचगाव) असे त्याचे नाव आहे. मंगळवार पेठेतील नंगीवली चौक परिसरातील श्री सेल्स एजन्सीज दुकानात कंपनीच्या पथकाने छापा टाकला. त्यात बनावट पेंटचा डबा जप्त केला. त्याची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी नीलेशकुमार रामशीश महंतो (रा. दिल्ली) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.