आश्कीन आजरेकरवर गु्न्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:41 AM2021-05-05T04:41:55+5:302021-05-05T04:41:55+5:30
कोल्हापूर : बिंदू चौकानजीक चॅनल टाकण्याच्या कामाचे विनापरवाना उद्घाटन केले, तसेच कार्यक्रमासाठी पाचपेक्षा अधिक लोक जमवून निमयांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ...
कोल्हापूर : बिंदू चौकानजीक चॅनल टाकण्याच्या कामाचे विनापरवाना उद्घाटन केले, तसेच कार्यक्रमासाठी पाचपेक्षा अधिक लोक जमवून निमयांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती आश्कीन गणी आजरेकर (रा. बागवान गल्ली, बिंदू चौक) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
कोरोना विषाणूंच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रतिबंधित आदेश दिले असताना, तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्या आदेशाचा भंग करत आश्कीन आजरेकर यांनी सोमवारी बिंदू चौकानजीक दसरा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रशासनाची परवानगी न घेता चॅनल टाकण्याच्या कामाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमावेळी पाचपेक्षा जादा लोक जमवून नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे मंगळवारी आजरेकर यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलमान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.