पोलिसांमधील गुन्हेगारी, भ्र्रष्टाचार कमी करणार : पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:35 AM2018-08-05T00:35:47+5:302018-08-05T00:37:20+5:30
कोल्हापूर : महाराष्टत असे कोणते शहर आहे की, ज्याला स्वत:ची ओळख आहे. मात्र, ते कोल्हापूर आहे. अशा जिल्ह्णात काम करताना सुरुवातीस पोलिसांमध्ये गुन्हेगारी, भ्रष्टाचार आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न करू. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबर वाहतूक समस्येचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ, असा विश्वास नवे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पदभार स्वीकारताना कोल्हापूरच्या जनतेला दिला.
ते म्हणाले, गडचिरोलीतील आणि कोल्हापुरातील कामाची पद्धत वेगळी आहे. मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच कामाला सुरुवात करतो. गुन्हेगारी नियंत्रण, संघटित गुन्हेगारीला आळा घालणे, वाहतूक समस्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यावर काम करण्याचा माझा निश्चितच भर राहील. कोल्हापूरला पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्यास संधी मिळणे, हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे.
पोलीस दलात लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे, ते रोखण्यासाठी आपण काय करणार? या प्रश्नावर ते म्हणाले, कर्मचाऱ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी लक्ष दिले जाईल. छुप्या मार्गाने अल्पकाळात फायदा मिळविण्यासाठी जर प्रयत्न केला तर त्याचा परिणाम आपल्या नोकरीवर, कुटुंबावर होईल हे दाखवून देऊ. जे चांगले काम करतात त्यांचा सन्मान करू. दहा लोक भ्रष्ट कारभार करीत असतील तर त्याचे प्रमाण एक-दोनवर आणण्याचा आपला प्रयत्न राहील.
इचलकरंजीतील गुन्हेगारीवर कठोर पाऊल उचलू
इचलकरंजी शहर व परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. येथील संघटित गुन्हेगारांची मोठी दहशत आहे. त्यांच्यापुढे एकही नागरिक तक्रार देण्यास पुढे येण्याचे धाडस करीत नाही.यावर डॉ. देशमुख म्हणाले, संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पाऊल उचलू.
नागरिकांना सन्मानाची वागणूक
ते म्हणाले, जिल्ह्णातील अधिकारी व कर्मचाºयांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून, महाराष्टÑात नागरिकांना सर्वांत चांगली वागणूक कोल्हापूर पोलिसांकडून मिळते, हे दाखवून देण्याचा आपला प्रयत्न राहिल.
कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत करताना मावळते पोलीस अधीक्षक संजय मोहिते.