म्हाळुंगे येथे वीजचोरीप्रकरणी पोल्ट्री व्यावसायिकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:37 AM2021-02-26T04:37:14+5:302021-02-26T04:37:14+5:30
कोल्हापूर : चोरून विजेचा वापर केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील पोट्री व्यावसायिकांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
कोल्हापूर : चोरून विजेचा वापर केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील पोट्री व्यावसायिकांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिग्वीजय दादासाहेब पाटील (रा. म्हाळुंगे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिग्वीजय पाटील यांचा म्हाळुंगे येथे पोल्ट्री व्यवसाय आहे. या ठिकाणी विद्युत मीटरमध्ये लूप टाकून थेट पोल्ट्री व्यवसायासाठी वीज वापर सुरू होता. अशा पद्धतीने वीजबील कमी येण्याची व्यवस्था केल्याचे महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार म.रा.वि.वि. कंपनीतील सहायक अभियंता नितीन अशोक शिंदे (रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर) यांनी तपासणी केली असता सुमारे ३४ हजार २६० रुपये किमतीची ३,८७० इतक्या वीज युनिटची वीजचोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर वीजचोरीचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केला.