आॅनलाईन मोबाईल्सवर चोरट्यांचा डल्ला अल्पवयीन मुलांसह तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:35 PM2017-10-24T23:35:19+5:302017-10-25T00:46:27+5:30
शिरवळ : ग्राहकांनी आॅनलाईन कुरिअरद्वारे मागविलेल्या मोबाईल फोनसह अनेक महागड्या वस्तूंचे पार्सल असलेला सुमारे ४६ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल परस्पर चोरून नेल्याची धक्कादायक घटना खंडाळा तालुक्यातील बावडा येथे घडली.
शिरवळ : ग्राहकांनी आॅनलाईन कुरिअरद्वारे मागविलेल्या मोबाईल फोनसह अनेक महागड्या वस्तूंचे पार्सल असलेला सुमारे ४६ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल परस्पर चोरून नेल्याची धक्कादायक घटना खंडाळा तालुक्यातील बावडा येथे घडली. याप्रकरणी दोन अल्पवयीन युवकांसह तिघांविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मुख्य आरोपी गायब झाला आहे.
खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा येथील एका खासगी कंपनीचे कुरिअर खंडाळा तालुक्यात वितरण करण्यासाठी बावडा येथील सुशांत गौतम भोसले हे कार्यरत आहे. ग्राहकांनी आॅनलाईन कुरिअरद्वारे मागिवलेल्या वस्तूंचे पार्सल हे पारगाव येथील एका पेपर विक्रेत्यांच्या घराजवळ येतात. त्याचे वितरण सुशांत भोसले हे संबंधित ग्राहकांकडेकरीत असतात. दरम्यान, शनिवार,दि. २३ सप्टेंबर रोजी सुशांत भोसलेयांचा मित्र असल्याचे सांगत कुरिअरने पार्सल येत असलेल्या पेपरविक्रेत्यांच्या पत्नीला खोटे सांगत मोबाईलसह महागडे वस्तू असलेले कुरिअरचे पार्सल लंपास केले होते.
याबाबतची फिर्याद खंडाळा पोलीस ठाण्यात सुशांत गौतम भोसले यांनी दिली. पोलीस हवालदार अमोल महांगरे तपास करीत आहे.
मुख्य आरोपी गायब
चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदीप पोळ गायब झाला आहे. सुदीप पोळ हा खंडाळा तालुक्यात बंद झालेल्या खंडाळा तालुका रेस्क्यू टीमचा पदाधिकारी म्हणून मिरवत होता. त्याच्याकडून अनेक कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.