नरतवडे येथे वीज चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:26 AM2021-03-17T04:26:00+5:302021-03-17T04:26:00+5:30
कोल्हापूर : महावितरण कंपनीची फसवणूक करून लघुदाब विद्युत वाहिनीतून वीज चोरीची घटना राधानगरी तालुक्यातील नरतवडे या गावी उघडकीस आली. ...
कोल्हापूर : महावितरण कंपनीची फसवणूक करून लघुदाब विद्युत वाहिनीतून वीज चोरीची घटना राधानगरी तालुक्यातील नरतवडे या गावी उघडकीस आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सागर मगदूम आणि आण्णासाहेब मगदूम (रा. नरतवडे, ता. राधानगरी) यांच्यावर मंगळवारी सायंकाळी वीज चोरीचे गुन्हे नोंदवले आहेत.
नरतवडे येथील मगदूम कुटुंबियांनी गेली दोन वर्षे वीज चोरी करून महावितरणची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लघुदाब विद्युत वाहिनीकडून मीटरला येणाऱ्या सर्व्हिस वायरला त्यांनी जोड दिला होता. तेथून विजेची चोरी करून ती वीज घरगुती उपकरणासाठी वापरली जात होती. त्यांची ही वीज चोरी महावितरणचे सहायक अभियंता नितीन जोशी यांनी पकडली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मगदूम बंधूंवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.