बिंदू चौकातील आंदोलनप्रकरणी देवणे, पोवार आदींवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 19:29 IST2021-05-26T19:28:28+5:302021-05-26T19:29:35+5:30
Morcha Kolhapur : शेतकरी, कोरोना आदी प्रश्नावर परिस्थिीती हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन आंदोलन केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, सचीन चव्हाण यांच्यासह विवीध पक्षाच्या एकूण २० जणांवर गुन्हे नोंदवले.

बिंदू चौकातील आंदोलनप्रकरणी देवणे, पोवार आदींवर गुन्हे
कोल्हापूर : शेतकरी, कोरोना आदी प्रश्नावर परिस्थिीती हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन आंदोलन केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, सचीन चव्हाण यांच्यासह विवीध पक्षाच्या एकूण २० जणांवर गुन्हे नोंदवले.
बिंदू चौकात बुधवारी सकाळी मोदी पुतळा दहन प्रकरणी आंदोलन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधीत आदेश असताना त्याचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवण्यात आले.
गुन्हे नोंदवल्यामध्ये विजय देवणे, आर. के. पोवार, कॉंग्रेसचे सचीन चव्हाण, भाकपचे रघुनाथ कांबळे, माकपचे शंकर काटाळे, जनता दलाचे रविंद्र जाधव, लाल बावटाचे अतुल दिघे, शेकापचे संभाजी जगदाळे, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई यांच्यासह एकूण २० जणांचा समावेश आहे.