सव्वा महिन्यात एक लाखाहून अधिक वाहनांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:48+5:302021-06-11T04:17:48+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणा-यांवर पोलीस कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सव्वा महिन्यात कोल्हापूर ...
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणा-यांवर पोलीस कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सव्वा महिन्यात कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यात सुमारे १ लाख १ हजार ३१९ वाहनांवर गुन्हे नोंदवत त्यांच्याकडून सुमारे १ कोटी ७६ लाख ८६ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. तर ८३५१ वाहने जप्त करण्यात आली.
कोरोना अनुषंगाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणा-यांवर कोल्हापूर पोलिसांच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उल्लंघन करणा-यांवर गुन्हे दाखल, दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. दि.४ मे ते १० जून दरम्यानच्या कालावधीत सुमारे एक लाखाहून अधिक वाहनावर कारवाई करत गुन्हे नोंदवले. विनामास्क फिरणा-या २५ हजार ५४६ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ५६ लाख ६७ हजार ७७३ रुपये दंड वसूल केला. मॉर्निंग वॉक करणा-या २५१० जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ८ लाख ८८ हजार २७० रुपये दंड वसूल केला. निर्बंधाच्या काळात आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल ११ लाख २ हजार २०० आस्थापनाधारकांकडून ८ लाख ८८ हजार २७० रुपये दंड वसूल केला.
गुरुवारी दिवसभरात २०२० वाहनांवर गुन्हे
गुरुवारी दिवसभरात मोटर व्हेइकल ॲक्टनुसार सुमारे २०२० वाहनांवर गुन्हे नोंदवले, त्यांच्याकडून २ लाख २३ हजार २०० रुपये दंड वसूल केला. ७४ वाहने जप्त केली. विनामास्कप्रकरणी ४१७ जणांकडून ६२ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. १६ आस्थापनाधारकांकडून ७५०० रुपये दंड वसूल केला.