पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:54 AM2021-09-02T04:54:14+5:302021-09-02T04:54:14+5:30

कोल्हापूर : गुन्हेगारी क्षेत्रात वापरण्यात येणारे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने सापळा रचून ...

Criminal arrested for selling pistols | पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक

Next

कोल्हापूर : गुन्हेगारी क्षेत्रात वापरण्यात येणारे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने सापळा रचून मुसक्या आवळल्या. सुधीर उल्हास सातपुते (वय ३९, रा. स्टेशन रोड, जवाहरनगर, इचलकरंजी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. ही कारवाई कबनूर (ता. हातकणंगले) येथे पंचगंगा सहकारी साखर कारखान्यासमोरील रिकाम्या जागेतील पाण्याच्या टाकीनजीक केली. त्याच्या ताब्यातून ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत राऊंड असे एकूण ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आगामी गणेशोत्सव सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांना शोधून त्याच्याकडील हत्यारे व दारूगोळा जप्त करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी पोलीस पथके तयार करून गुन्हेगारांची शोधमोहीम सुरू केली आहे. त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, पोलीस नेताज डोंगरे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, उत्तम सडोलीकर यांनी कबनूर (ता. हातकणंगले) येथे सापळा रचला. त्यावेळी पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने आलेला सराईत गुन्हेगार सुधीर सातपुते याला अटक केली. त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल मिळाला. त्याला मुद्देमालासह शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

वैभव पाटीलची सतर्कता

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार सुधीर सातपुते हा पिस्तूल विक्रीसाठी कबनूरमध्ये येत आहे. त्यानुसार पोलीस पथकाने खात्री करून सापळा रचला. नियोजनबद्ध करवाई केल्यामुळे सातपुते अलगत पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याविरोधात शिवाजीनगर व चंदगड पोलीस ठाण्यांत गंभीर दुखापत, खून, खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-कबनूर ॲक्शन

ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बुधवारी कबनूर (ता. हातकणंगले) येथे सापळा रचून अटक केलेल्या सुधीर सातपुते या सराईत गुन्हेगारांकडून जप्त केलेले पिस्तूल व जिवंत राऊंड.

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-वैभव पाटील (पोलीस)

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-सुधीर सातपुते (आरोपी)

010921\01kol_22_01092021_5.jpg~010921\01kol_24_01092021_5.jpg~010921\01kol_25_01092021_5.jpg

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-कबनूर ॲक्शन०१ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बुधवारी कबनूर (ता. हातकणंगले) येथे सापळा रचून अटक केलेल्या सुधीर सातपुते या सराईत गुन्हेगारांकडून जप्त केलेले पिस्तूल व जीवंत राऊंड.फोटो नं. ०१०९२०२१-कोल-वैभव पाटील (पोलीस)फोटो नं. ०१०९२०२१-कोल-सुधीर सातपुते (आरोपी)~फोटो नं. ०१०९२०२१-कोल-कबनूर ॲक्शन०१ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बुधवारी कबनूर (ता. हातकणंगले) येथे सापळा रचून अटक केलेल्या सुधीर सातपुते या सराईत गुन्हेगारांकडून जप्त केलेले पिस्तूल व जीवंत राऊंड.फोटो नं. ०१०९२०२१-कोल-वैभव पाटील (पोलीस)फोटो नं. ०१०९२०२१-कोल-सुधीर सातपुते (आरोपी)~फोटो नं. ०१०९२०२१-कोल-कबनूर ॲक्शन०१ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने बुधवारी कबनूर (ता. हातकणंगले) येथे सापळा रचून अटक केलेल्या सुधीर सातपुते या सराईत गुन्हेगारांकडून जप्त केलेले पिस्तूल व जीवंत राऊंड.फोटो नं. ०१०९२०२१-कोल-वैभव पाटील (पोलीस)फोटो नं. ०१०९२०२१-कोल-सुधीर सातपुते (आरोपी)

Web Title: Criminal arrested for selling pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.