निर्बंधाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:56+5:302021-03-17T04:24:56+5:30
कोल्हापूर : सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टारंटस् ५० टक्के क्षमतेच्या अधिन राहूनच सुरू ठेवावी लागणार आहेत. ‘नो मास्क, नो एन्ट्री’, ...
कोल्हापूर : सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टारंटस् ५० टक्के क्षमतेच्या अधिन राहूनच सुरू ठेवावी लागणार आहेत. ‘नो मास्क, नो एन्ट्री’, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स बंधनकारकच आहे, याचे पालन संबंधित व्यवस्थापनाला करावेच लागणार आहे, त्यात हयगय केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंडासह फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिला.
शॉपिंग मॉल्समध्येही तपासणी व मास्क बंधनकारक असणार आहे. त्यात हयगय आढळल्यास दुकाने बंद ठेवण्यात येतील. कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणुका, संमेलने तसेच यात्रा, उत्सव, उरुस याच्या आयोजनास परवानगी नाही. तरीदेखील आयोजन केले तर संबंधित कार्यक्रमाचे आयोजक, जागामालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंड वसूल करण्यास तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. विवाह समारंभ कार्यक्रमास फक्त ५० नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. त्याचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमाचे ठिकाण, हॉल मालक यांच्यावर कारवाई होईल.
१.अंत्यविधी, अंत्ययात्रा इत्यादीसाठी २० नागरिकांना परवानगी असेल.
२.स्थानिक आठवडी बाजार (जनावरांच्या बाजारासह) सुरू राहण्यास परवानगी आहे. पण नियमांचे पालन होते की नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांची राहील.
३. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दुचाकी, ऑटो रिक्षा, खासगी प्रवासी बसेस यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सक्तीने मास्कचा वापर करणे बंधनकारक
४. सर्व कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील, बाकीचे वर्क फ्रॉम होम करतील.
५. धार्मिक स्थळे खुली राहतील, पण भाविकांची प्रवेश संख्या निश्चित करणे
गृह अलगीकरणास
गृह अलगीकरण झालेल्या नागरिक, रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. गृहअलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे याची माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक असेल.