सराईत गुन्हेगारांचा पोलिसांसह तिघांवर सशस्त्र हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:02+5:302021-05-03T04:19:02+5:30
कोल्हापूर : दौलतनगरातील चौघा सराईत गुन्हेगारांनी पोलिसांसह तिघांवर सशस्त्र हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री ...
कोल्हापूर : दौलतनगरातील चौघा सराईत गुन्हेगारांनी पोलिसांसह तिघांवर सशस्त्र हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री राजारामपुरीतील माउली चौकात घडली. राजारामपुरीचे पोलीस कर्मचारी युवराज मोहन पाटील (वय ३०) यांच्यासह साजिद ऊर्फ फिरोज अल्लाबक्ष शेख (१९, रा. यादव कॉलनी, सरनाईक वसाहत, जवाहरनगर), सौरभ शशिकांत बेलवणकर (३२ रा. शाहू चौक, लक्षतीर्थ वसाहत) अशी जखमींची नावे आहेत. हल्लेखोरांनी कुकरी, चाकू, दगडाचा वापर केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक जण अद्याप फरारी आहे.
पोलिसांनी चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (२० रा. दौलतनगर), अभिषेक मनोज हवालदार (१९ रा. राजारामपुरी पोलीस ठाणेसमोर), नागेश सुरेश वडर (२५ रा. जागृतीनगर, राजारामपुरी) यांना पोलिसांनी अटक केली, तर सोन्या कुराडे (रा. दौलतनगर) हा अद्याप फरारी आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजारामपुरी माउली पुतळा चौकानजीक पेट्रोलला पैसे दिले नाही म्हणून संशयित चौघांनी साजिद शेख याच्यावर कुकरी, चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डोक्यात, पोटावर व हातावर गंभीर दुखापत झाली, त्यावेळी गोंधळ माजल्याने तेथे चार्ली कर्तव्यावर असणारा पोलीस कर्मचारी युवराज पाटील हे तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी चिन्या व अभिषेक या दोघांना पकडले. पण दोघांनी पोलीस युवराज यांच्यावर कुकरी व दगडाने हल्ला केला व दुचाकीवरील वायरलेसचा वॉकीटॉकी जमिनीवर आपटून फोडला. हल्ल्यात पाटील जखमी झाले. पळून जाणाऱ्या गुन्हेगारांनी रस्त्यावरून निघालेल्या सौरभ बेलवणकर यांच्याही डोक्यात चाकू मारून त्यालाही जखमी केले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे खळबळ माजली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संशयित गुन्हेगारांची धरपकड केली. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली तर एक जण अद्याप फरार आहे.
‘युवराज’ने केला धाडसाने पाठलाग
कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी युवराज पाटील हे माहिती मिळताच तातडीने दुचाकीचा सायरन वाजवतच माउली चौकात आले. हल्ला करून पळणाऱ्या गुन्हेगारांचा त्यांनी पाठलाग केला. त्यांनी धाडसाने दुचाकीवर बसूनच अभिषेक व चिन्या या दोघांना पकडले. त्याचवेळी चिन्याने कुकरीने केलेला हल्ला युवराज यांनी चुकवला; पण पुढील क्षणी सोन्या कुराडे याने त्यांच्यावर दगडाने हल्ला केल्याने पकडलेले दोघेही सुटले. तर दुचाकीचा सायरन वाजतच राहिल्याने अभिषेकने दुचाकीवरील पोलिसांची वॉकीटॉकी हिसडा मारून घेतली व रस्त्यावर आपटून फोडली. ‘युवराज’ने केलेल्या धाडसाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही फोनवरून कौतुक केले.
हॉर्न वाजवला अन् त्याच्यावरही हल्ला
सौरभ बेलवणकर हा आपल्या दुचाकीवरून औद्योगिक वसाहतमध्ये नोकरीसाठी जात होता. पळणारे संशयित दुचाकीच्या आडवे आल्याने त्याने हॉर्न वाजवला. त्यावेळी चिन्या हळदकरने सौरभची दुचाकी अडवून त्याच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याला जखमी केले.
फोटो नं. ०२०५२०२१-कोल-युवराज पाटील (पोलीस)
===Photopath===
020521\02kol_6_02052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. ०२०५२०२१-कोल-युवराज पाटील(पोलीस)