कोल्हापूर बंद दडपल्यास गंभीर परिणाम आंदोलक नेत्यांचा इशारा : मराठा आरक्षणप्रश्नी आज बंद; भगवी लाट अवतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:13 AM2018-08-09T01:13:26+5:302018-08-09T01:13:56+5:30

मुख्यमंत्री हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत; पण आज, गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ हा कोणत्याही स्थितीत होणारच! त्यामुळे

 Critical consequences if Kolhapur clerk closes: Maratha reservation question is closed today; Bhagwati wave will come out | कोल्हापूर बंद दडपल्यास गंभीर परिणाम आंदोलक नेत्यांचा इशारा : मराठा आरक्षणप्रश्नी आज बंद; भगवी लाट अवतरणार

कोल्हापूर बंद दडपल्यास गंभीर परिणाम आंदोलक नेत्यांचा इशारा : मराठा आरक्षणप्रश्नी आज बंद; भगवी लाट अवतरणार

Next

कोल्हापूर : मुख्यमंत्री हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत; पण आज, गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ हा कोणत्याही स्थितीत होणारच! त्यामुळे ‘बंद’मध्ये कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवल्यास त्याला जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा सकल मराठा ठोक मोर्चाच्यावतीने दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, नागरिकांनी सकाळी दसरा चौकात एकत्र येऊन शांततेने आंदोलन करावे, असे आवाहनही यावेळी केले.

आज, गुरुवारी सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने ‘कोल्हापूर बंद’चे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर देसाई म्हणाले, गेले चौदा दिवस आंदोलन शांततेत सुरू असताना पोलीस एकीकडे शांततेसाठी बैठका घेत आहेत; तर दुसरीकडे मराठा आंदोलन मोडण्याचा पोलीस प्रशासनाचा डाव आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ग्रामीण भागातून येणारी वाहतूक पोलिसांनी अडवू नये, असेही आवाहन केले.

यावेळी हर्षल सुर्वे, वसंत मुळीक, प्रसाद जाधव, जयेश कदम, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, संदीप पाटील, उमेश पोवार, गणी आजरेकर उपस्थित होते.

'दडपण नको : दसरा चौकात या
आज, गुुरुवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्यात आली असून, गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी दसरा चौकात यावे. पोलीस काही गावांत भेटून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला भीक घालू नका, असे आवाहन आंदोलकांनी केले असून;पोलिसांच्या आडमुठ्या धोरणाने गंभीर गोष्ट घडल्यास त्याला शासनच जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी दिला.
मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही
मुख्यमंत्री फडणवीस हे पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेचा वापर करून आंदोलन मोडीत काढत आहेत. त्याबद्दल त्यांचा निषेध करून, आंदोलकात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना घराबाहेर पडू देणार नसल्याचा इशारा इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत आणि स्वप्निल पार्टे यांनी दिला.
‘गोकुळ’चे आज दूध संकलन बंद
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ‘महाराष्टÑ बंद’च्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी सकाळचे दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळचे संकलन मात्र केले जाणार आहे.
बंद काळात तोडफोड होऊ नये आणि मराठा समाजाने केलेल्या आवाहनास पाठिंबा देण्यासाठी ‘गोकुळ’ने दूध संकलन बंद केले आहे. ‘गोकुळ’चे सकाळी साधारणत: साडेसहा लाख लिटर संकलन होते. एवढे दूध घरात राहणार आहे. मात्र सायंकाळचे संकलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
‘गोकुळ’ने एकवेळचे दूध संकलन बंद केल्याने पुणे, मुंबईतील दूध वितरणावर त्याचा परिणाम होऊ नये, याचे नियोजन संघाने केले आहे. मुंबईत रोज सात लाख लिटर दूध वितरित होते. सकाळ व सायंकाळी दुधाचे ४० टॅँकर मुंबईकडे जातात. संपामुळे गुरुवारी मुंबईकडे टॅँकर जाणार नाहीत. संप गृहीत धरून संघाने अगोदरच त्याची पूर्तता केली आहे. बुधवारी (दि. ८) नियमित ४० टॅँकर जाऊन रात्री उशिरापर्यंत १५-२० टॅँकर पाठविले आहेत.
 

नगरसेवक बंदमध्ये सहभागी होणार
कोल्हापूर : महानगरपालिकेतील कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसचे नगरसेवक आज, गुरुवारच्या कोल्हापूर बंदमध्ये सहभागी होणार आहेत. पक्षाच्या पातळीवरच त्यांना तसे निरोप देण्यात आले आहेत.
ठिय्या आंदोलनात पहिल्या दिवसापासून कॉँग्रेस व राष्टÑवादीचे नगरसेवक सहभागी झाले आहेत. महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, राष्टÑवादीचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव यांच्यासह सर्वच नगरसेवक रोज सकाळी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावत होते. ताराराणी आघाडीचे नगरसेवकसुद्धा आंदोलनात सक्रिय आहेत. गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक ईश्वर परमार यांच्यासह ताराराणीचे नगरसेवक व्यासपीठावर येऊन गेले आहेत. याऊलट भाजपचे नगरसेवक आंदोलनाकडे फिरकले नाहीत. आजच्या कोल्हापूर बंदमध्ये सहभागी होण्याच्या सूचना कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांनी दिल्या आहेत.

Web Title:  Critical consequences if Kolhapur clerk closes: Maratha reservation question is closed today; Bhagwati wave will come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.