खासदार संभाजीराजे यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही : समर्थकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:31 PM2020-01-13T15:31:43+5:302020-01-13T15:34:05+5:30

स्वत:चे महत्व वाढवून घेण्यासाठी खासदार संजय राउत यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माहिती न घेता टीका करु नये, अन्यथा सडेतोड भूमिका घेण्यात येईल, त्यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे यांचे समन्वयक योगेश केदार यांनी दिला.

The criticism of MP Sambhaji Raje will not be tolerated: warning of supporters | खासदार संभाजीराजे यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही : समर्थकांचा इशारा

खासदार संभाजीराजे यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही : समर्थकांचा इशारा

Next
ठळक मुद्देखासदार संभाजीराजे यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही : समर्थकांचा इशारापत्रकार परिषदेत संभाजीराजे यांचे समर्थकांनी मांडली भूमिका

कोल्हापूर : स्वत:चे महत्व वाढवून घेण्यासाठी खासदार संजय राउत यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माहिती न घेता टीका करु नये, अन्यथा सडेतोड भूमिका घेण्यात येईल, त्यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे यांचे समन्वयक योगेश केदार यांनी दिला.

कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये संभाजीराजे यांचे समर्थकांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात आपली भूमिका मांडली. यावेळी फत्तेसिंह सावंत, संजय पवार, उदय घोरपडे, अमर पाटील, सोमनाथ लांबोरे उपस्थित होते.

खासदार संभाजीराजे छत्रपती गेली अनेक वर्षे बहुजन समाजासाठी कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी माहिती न घेता राउत यांनी टीका करु नये. रोज सकाळी उठल्या उठल्या संभाजीराजे यांच्या फेसबुकवरच्या पोस्ट पाहिल्या तरी राउत यांच्या ज्ञानात भर पडेल, असेही मत योगेश केदार यांनी व्यक्त केले. जनतेच्या गळ्यातील ताईत असलेल्या संभाजीराजे यांच्या कामाची माहिती न घेता राउत यांनी टीका करु नये. अन्यथा हे सहन करणार नाही, प्रसंगी सडेतोड भूमिका घेउ, असा इशाराही केदार यांनी यावेळी दिला.

भाजपने काढलेले वादग्रस्त पुस्तक केंद्र सरकारने ताब्यात घ्यावे आणि त्यावर तत्काळ बंदी आणावी, अशी मागणी यावेळी खासदार संभाजीराजे यांच्या समर्थकांनी केली. खासदार संभाजीराजे यांच्या राजीनाम्यासंदर्भात केलेल्या मागणीबाबत बोलताना या समर्थकांनी सांगितले, की त्याबाबत जनताच निर्णय घेईल, इतरांना बोलण्याचा अधिकार नाही.

Web Title: The criticism of MP Sambhaji Raje will not be tolerated: warning of supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.